सटाणा तालुक्यात शेतकर्यांचा संतापाचा उद्रेक झाला आहे. महावितरणाकडून अन्यायकारक बिले दिल्यानंतर, सक्तीची वसुली होत आहे.
नाशिक/प्रतिनिधी : सटाणा तालुक्यात शेतकर्यांचा संतापाचा उद्रेक झाला आहे. महावितरणाकडून अन्यायकारक बिले दिल्यानंतर, सक्तीची वसुली होत आहे. याविरोधात आज शेतकर्यांच्या संतापाचा उद्रेक झाला.
या वेळी शेतकर्यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी करायला आलेल्या आमदारालाच ग्रामपंचायतीत कोडले. आमदार दिलीप मंगळू बोरसे हे अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी गेले होते, तेव्हा शेतकर्यांनी त्यांना कार्यालयात बसवले. त्यांच्यासोबत आत काही गावकरीदेखील आहेत. काहींनी दार लावून ग्रामपंचायत कार्यालयसमोर ठाण मांडले. अवकाळी पावसाचा वरून मार पडतो आहे. कोरोनाच्या काळात पिकांना कोणताही भाव मिळाला नाही आणि सरकारकडून अव्वाच्या सव्वा बिले दाखवून, सुल्तानी वसुली केली जात आहे. तसेच वीज कंपनीने जे कनेक्शन तोडले आहेत, ते ताबडतोब जोडा, अन्यथा आमदारसाहेबांना कार्यालयाबाहेर सोडणार नसल्याचा पवित्रा गावकर्यांनी घेतला. त्यानंतर बोरसे यांची तासाभरात गावकर्यांनी सुटका केली आहे.
COMMENTS