आनंदोत्सव साजरा करतांना संकटाचेही भान ठेवा!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

आनंदोत्सव साजरा करतांना संकटाचेही भान ठेवा!

कोव्हिड १९ ची लाट ओसरत असतांना भारताने लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा पार केला आहे.म्हणून भारत वर्षात दुहेरी आनंदोत्सव साजरा केला जात आहे.तथापी या आनंद

सीएए कायदा : हिंदूंनाही जाचक !
प्रा. हाके यांचे उपोषण ओबीसींसाठी की ‘माधव’
भारनियमनः सरकारची कसोटी

कोव्हिड १९ ची लाट ओसरत असतांना भारताने लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा पार केला आहे.म्हणून भारत वर्षात दुहेरी आनंदोत्सव साजरा केला जात आहे.तथापी या आनंदोत्सवात आपले भान विसरता कामा नये.संकटाची तिव्रता कमी झाली आहे,संकट पुर्णतः टळलेले नाही.हे लक्षात ठेवून आपली पाऊले पडायला हवीत.येणाऱ्या काळात अनेक संकटांशी आपल्याला सामोरे जायचे आहे.सोबत लसींचे होणारे दुष्परिणामांच्या टांगती तलवारीचेही आव्हान आहेच.
जागतिक महामारी म्हणुन ओळखल्या गेलेल्या कोविड या संसर्गजन्य महामारीशी मुकाबला करतांना भारताला इतर देशांच्या तुलनेत बर्‍यापैकी यश मिळाले. परंतु दुसर्‍या लाटेच्या आगमनानंतर जनतेतील उदासीनता संसर्ग वाढण्यास  कारणीभूत ठरली. महाराष्ट्रातील आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ज्या संयमाने राज्यातील स्थिती नियत्रंणात आणली ती कौतुकास पात्र आहे.  दुसर्‍या लाटेत मुत्यूसंख्येत मोठया प्रमाणावर वाढ झाली  हे नाकारुन चालणार नाही.  मागील दीड वर्षात लॉकडाऊन काळात ज्या पध्दतीने सर्वच क्षेत्रात आर्थिक मंदी आली आहे त्यातुन आपण अद्यापही सावरु शकलेलो नाही.  लहान ,मध्यम, उद्योगांवर कोसळलेले आर्थिक संकट हे उद्योगांना डबघाईस आणणारे तर ठरलेच, परंतु त्याचा परिणाम बाजारपेठेवर देखील झाला. परिणामी बँकींग क्षेत्रावर त्याचा विपरित परिणाम झाला. बँकाचे थकित कर्ज मोठया प्रमाणावर वाढल्याने बँकाची आर्थिक स्थिती गंभीर  बनली.  उद्योग,रोजगार बाजारपेठ आणि बँकिंग अशी साखळी आर्थिक संकटात सापडल्याने भारतीय अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करते आहे. त्याचा परिणाम राज्यावंर देखील होतो आहे. राज्य सरकार विकासाच्या योजंनावर पैसा खर्च करण्यास असमर्थ ठरत आहेत. जनतेच्या खिशात पैसा नसल्याने बाजारपेठांवर मंदीचे सावट आलेले  आहे. माल वाहतुक आणि प्रवासी वाहतुक काही काळ बंद असल्याने या क्षेत्रांना आर्थिक झळ पोहचलेली आहे. परिवहन मंडळ  त्यामुळे संकटात सापडले आहे. शालेय शिक्षण बंद अवस्थेत असल्याने त्यांचे ही पडसाद वाहतुक  व्यवस्थेवर तसेच  कपडा, स्टेशनरी सारख्या घटकांवर मोठया प्रमाणावर पडले आहेत. मुलांच्या मानसिक आरोग्याचा मोठा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे विज महावितरण मोठया आर्थिक संकटात सापडले आहे. कोरोना काळात टाळेबंदीमुळे नागरिकांचे आर्थिक स्त्रोत बंद झाल्याने विजबील वसुलीचे प्रमाण जवळपास नगण्य झाले.  राज्य सरकार समोर मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य अंधारात बुडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने उर्जामत्र्यांसमोर महावितरणचे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. लहान व्यावसायिक, लघु व मध्यम उदयोग,  घरगुती  विज ग्राहक,कृषी पंपासाठी विजेचा वापर करणारे शेतकरी या सर्व घटकांनी विज  देयके न भरल्याने महावितरणाचा आर्थिक बोजा मोठा प्रमाणावर वाढला आहे. यावर देखील राज्य सरकारला गंभिर पावले उचलावी लागणार  आहेत. गॅस, पेट्रोल,डिझेल सारख्या इंधनाचे दर वाढल्याने महागाई मोठया प्रमाणावर वाढते आहे. वाहतुकीचा परिणाम हा वस्तुच्या किमंती वाढण्यात होत असल्याने भाजीपाला,  डाळी,अन्न धान्य, तेल, साखर या वस्तुच्या किमंती मोठया प्रमाणावर वाढत आहे. त्याचा परिणाम सामान्य माणसाच्या  क्रयशक्तीवर होत असल्याने पून्हा  बाजारपेठावंर त्याचा विपरित परिणाम होतो आहे. असे हे आर्थिक दुष्टचक्र फिरत असल्याने प्रतिव्यक्ति उत्पन्न घटले आहे. जो पर्यंन्त ग्राहकाच्या खिशात पैसा येणार नाही तो पर्यन्त बाजारपेठांमध्ये उर्जितावस्था निर्माण होणार नाही. परंतु यांचे दुरगामी परिणाम अर्थव्यवस्थेवर होतात. हे समजुन घेण्याची आवश्यकता आहे. तालीबान, चीन, पाकिस्थान सारख्या देशाचे संकट देशाच्या सीमारेषावर पोहचले आहे. त्याचाही परिणाम देशाच्या आयात – निर्यात धोरणांवर होणारच. अशा सर्व संकटाचा सामना सरकारला करावा लागेलच. परंतु त्याची झळ सामान्य माणसाला पोहचेल. त्यामुळे येणार्‍या काळातील विविध संकटांना आम्हाला सामोरे जावे लागेल. एका बाजूला ही परिस्थिती असतांना कोरोना महामारीविरूध्द सुरू केलेली लढाई आपण जवळपास  जिंकली आहे.लसीकरणापुरते बोलायचे झाले तर शंभर कोटीची यशस्वी वाटचाल ही आपली मिळकत आहे.त्यामुळे जागतिक आरोग्य संघटन, युनिसेफ सारख्या जागतिक संघटनांनी भारताच्या या यशस्वी कामगिरीचे कौतुक केले आहे.सुरुवातीच्या काळात लस टोचून घेण्यास लोक लसीबद्दल असलेल्या गैरसमजूतीमुळे लस टोचून घेण्यास धजावत नव्हते.काळ पुढे सरकत गेला तसे  लसीबद्दल असलेला गैरसमज दूर झाल्यामुळे शंभर कोटीचा लसीकरणाचा टप्पा आपण पुर्ण करु शकलो.  नागरीक आणि सरकार लोकसहभागाच्या  भावनेने एका ध्येयासाठी एकत्र आले तर देश काय साध्य करु शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे देशाने ओलांडलेला लसीकरणाचा शंभर कोटीचा डोसचा पल्ला. भारतासारख्या 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात शंभर कोटीचा डोसचा आकडा पार करण्यावर शंका घेणारे जगातील अनेक देश, ज्यांनी भारतीय लोकांच्या क्षमतेवर अविश्वास दाखवला, काहींनी सांगीतले भारताला लसीकरणासाठी तीन-चार वर्षे लागतील. लोक लसीकरणासाठी पुढे येणार नाहीत भारत एवढ्या  मोठ्या लसीचा पुरवठा करु शकत नाही.या शंका कुशंकांना कृतीतून उत्तर मिळाले. एकूणच आपण कोरोना विषाणूला थोपवून लसीकरण मोहीमेत मिळालेले यश साजरे करीत असलो तरी अगदी सुरूवातीला सांगीतलेली आव्हाने आणि लसीकरणाचे दुष्परिणाम आपल्यासमोर आव्हान म्हणून उभे आहेत.देशात ठिकठिकाणी लसीचे दुषौपरिणाम होऊन मृत्यू होण्याच्या घटना समोर येत आहेत.त्याचेही भान आपल्याला ठेवावे लागेल,उत्साहानंदाच्या भरात आपल्यासमोर असलेल्या संकटाकडे दुर्लक्ष होऊ नये एव्हढीच अपेक्षा!

COMMENTS