आधारचा गैरवापर केल्यास होऊ शकतो एक कोटींचा दंड

Homeताज्या बातम्यादेश

आधारचा गैरवापर केल्यास होऊ शकतो एक कोटींचा दंड

नवी दिल्ली : आधार कार्डचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात यूआयडीएआयने कठोर पावले उचलली आहे. त्यामुळे यापुढे आधारचा गैर

विहिरीत पडलेला वाघ तब्बल पाच तासांनी बाहेर (Video)
अपघात आणि सुरक्षेची चिंता
स्टेट बँकेचा शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आधार : कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील

नवी दिल्ली : आधार कार्डचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात यूआयडीएआयने कठोर पावले उचलली आहे. त्यामुळे यापुढे आधारचा गैरवापर केल्यास तब्बल एक कोटी रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. तसा अधिकार आता यूआयडीएआयला देण्यात आला आहे.
कायद्याला मंजुरी मिळाल्यानंतर दोन वर्षांनंतर याबद्दलची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यूआयडीएआय आधारच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात कारवाई करण्यासाठी अधिकार्‍यांची नियुक्ती करू शकते. याशिवाय दोषींना 1 कोटीपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. सरकारने 2 नोव्हेंबरला याबद्दलची अधिसूचना काढली आहे. या प्रकरणी यूआयडीएआयनं नियुक्त केलेले अधिकारी निर्णय घेतील. केंद्र सरकारनं आधार आणि अन्य कायदा (सुधारणा) अधिनियम 2019 मध्ये आणला. यूआयडीएआयला कारवाईचे अधिकार मिळावेत हा त्यामागचा उद्देश होता. सध्याच्या घडीला असलेल्या अधिनियमच्या अंतर्गत यूआयडीएआयला आधार कार्डचा गैरवापर करणार्‍या संस्थाविरोधात कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. यूआयडीएआयला कारवाईचे अधिकार देणारी अधिसूचना 2 नोव्हेंबरला काढण्यात आली. या प्रकरणातील तक्रारींवर घेणारा अधिकारी केंद्र सरकारमध्ये संयुक्त सचिव पद किंवा त्याहून वरच्या पदावर कार्यरत असलेला असेल.

COMMENTS