नमस्कार , मी सोमनाथ मान्ग्थ जंगम जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र . मेष:- बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. सामाजिक प्रश्नांवर भाष्य करू नका.
नमस्कार , मी सोमनाथ मान्ग्थ जंगम जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र .
मेष:-
बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. सामाजिक प्रश्नांवर भाष्य करू नका. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. शुभ रंग गुलाबी
शुभ अंक ६
वृषभ:-
दिवस आनंदात जाईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रत्येक गोष्टीचा उत्तम रसास्वाद घ्याल. गायन कलेला वेळ द्यावा. शुभ रंग पिवळा शुभ अंक ९
मिथुन:-
धाडसाने कामे हाती घ्याल. ठाम निर्णय घ्यावे लागतील. कामात द्विधावस्था आड येऊ देऊ नका. फसवणुकीपासून सावध राहा. अनावश्यक खर्चाला आळा घाला.शुभ रंग नारंगी शुभ अंक ५
कर्क:-
इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करावा. घरातील मोठ्या व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. एखादी जुनी आकांक्षा पूर्ण होईल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. शुभ रंग हिरवा शुभ अंक १
सिंह:-
प्रलंबित थकबाकी प्राप्त होईल. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. मनातील निराशाजनक भाव काढून टाकावेत. लहान मुलांच्यात खेळावे. जेणेकरून मनावरील ताण कमी होईल. शुभ रंग निळा शुभ अंक ८
कन्या:-
सकारात्मक उर्जेने काम करावे. जवळच्या व्यक्तीकडून मदत घेता येईल. अधिकारी वर्गाची गाठ घेता येईल. तुमच्या मनातील इच्छेला मुरड घालू नका. शुभ रंग लाल शुभ अंक ७
तूळ:-
उजळ बाजू लक्षात घेऊन वागावे. कमी श्रमातून मिळणार्या फायद्याकडे तुमचा कल राहील. वारसाहक्काच्या कामातून लाभ संभवतो. काही कामे तुमची चिकाटी पणाला लावू शकतात.शुभ रंग पिवळा शुभ अंक ३
वृश्चिक:-
जीवनसाथी बरोबर दिवस मजेत घालवाल. प्रेमाचा सुंदर आविष्कार पहायला मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्या कोणाला घेऊ देऊ नका. शुभ रंग निळा शुभ अंक ९
धनू:-
केलेल्या कामातून समाधान मिळेल. देवाण-घेवाणीच्या कामात सतर्क राहावे. कौटुंबिक वातावरण शांततेचे राखावे. काहीतरी नवीन करून घरच्यांना खुश कराल. शुभ रंग गुलाबी शुभ अंक ४
मकर:-
कामाच्या व्यापामुळे त्रासून जाऊ नका. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. विचार करून साहस करावे. शुभ रंग जांभळा शुभ अंक १
कुंभ:-
घरासाठी काही नवीन खरेदी केली जाईल. पैसे खर्च करताना मागचा-पुढचा विचार करावा. आरोग्यात हळूहळू सुधारणा दिसून येईल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. शुभ रंग पांढरा शुभ अंक ७
मीन:-
निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. जवळच्या मित्र मंडळींमध्ये वेळ घालवाल. तुमच्या स्वभावातील गोडवा सर्वांच्या नजरेत येईल. दिवस मजेत जाईल. शुभ रंग पोपटी शुभ अंक ३
COMMENTS