आघाडीत बिघाडी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे डॅमेज कंट्रोल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आघाडीत बिघाडी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे डॅमेज कंट्रोल

टाटा रुग्णालयाला म्हाडाची शंभर घरे देण्याबाबतच्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला दिलेली स्थगिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे घेतली आहे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी मोठा दिलासा मिळाला आहे.

पुणेवाडी येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न 
अजब गाढवाची गजब कथा.. अंत्यविधि, सावडणे, श्राध्द विधीला जाणारे गाढव !
अमरनाथ यात्रेला पुन्हा सुरुवात, 40 भाविक अजूनही बेपत्ताच

मुंबई /प्रतिनिधी: टाटा रुग्णालयाला म्हाडाची शंभर घरे देण्याबाबतच्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला दिलेली स्थगिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे घेतली आहे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या स्थगितीच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील बिघाडी होण्याची शक्यता होती; मात्र ही स्थगिती मागे घेतल्याने आघाडीतील बिघाडी टळली आहे. 

    मागील महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून कॅन्सर रुग्णांच्या नातेवाइकांसाठी कासम हाजी इमारतीत देण्याचा निर्णय घेतला होता. त्याला स्थानिकांनी विरोध केला होता. स्थानिक आमदारांनी त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांना सांगितल्या गेल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आजच्या आज त्याच परिसरात जागा शोधा आणि त्या द्या अशा सूचना केल्या. त्यानुसार बॉम्बे डाईंगमध्ये शंभर सदनिका आहेत, त्या देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या संमतीने घेतला गेला आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. दरम्यान, महाविकास आघाडीत अनेकवेळा नाराजी दिसून आली आहे. मंत्र्यांनी घेतलेले निर्णय मुख्यमंत्र्यांनी बदलल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. आव्हाड यांनी म्हाडाचे फ्लॅट टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती; मात्र आज याबाबत योग्य तो तोडगा काढत महाविकास आघाडीतील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. म्हाडाचे फ्लॅट टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याचा निर्णय आव्हाड यांनी घेतला होता. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते इमारत हस्तांतराचा कार्यक्रम पार पडला होता. कॅन्सर पेशंटच्या नातेवाइकांच्या तात्पुरत्या निवासासाठी म्हाडातर्फे टाटा कॅन्सर रुग्णालयाला या सदनिका देण्यात आल्या होत्या. शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. या इमारतीच्या बाजूच्या रहिवाशांचा याला विरोध असल्याचे चौधरी यांच्या तक्रारीत म्हटले होते. त्यापार्श्‍वभूमीवर मु्ख्यमंत्री यांनी म्हाडाचे फ्लॅट टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

COMMENTS