नगर- नगर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर गर्भगिरी डोंगररांगेतील असलेल्या आगडगाव येथील श्री काळ भैरवनाथांचे मंदिर भाविकां
नगर- नगर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर गर्भगिरी डोंगररांगेतील असलेल्या आगडगाव येथील श्री काळ भैरवनाथांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्यानंतर महिन्या नंतर रविवारी आमटी भाकरीच्या महाप्रसादाला प्रारंभ करण्यात आला दीड वर्षानंतर झालेल्या प्रसादाचा ३००० भाविकांनी घेतला लाभ घेतला असल्याची माहिती भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बलभीम कराळे यांनी सांगितले.
या ठिकाणी प्रत्येक रविवारी होणारा महाप्रसाद सुरु करावा अशी भाविकांनी मागणी होती त्यामुळे आजपासून हा महाप्रसाद सुरु करण्यात आला आहे बाजरीची भाकरी अन् खमंग,चरचरीत आमटी,त्यावर लिंबू अन् कांदाही,सोबत भात आणि गोड पदार्थ लापशी हा महाप्रसाद देण्यात आला. रविवारी दुपारी बारा वाजता आजचे १६ अन्नदात्यांच्या हस्ते महाआरती झाली,नंतर सर्वाना महाप्रसाद”पोटभर जेवण’ देण्यात आले
कोरोनामुळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद होते.मंदिरे उघडल्यानंतर भाविक दर्शनाला येऊ लागले आहे,देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची बैठक होऊन सर्व शासकीय नियमांची अंमलबजावणी करीत दर्शन सुविधा करण्यात आली आहे.सॅनिटायझरचा आवश्यक त्या सर्व ठिकाणी वापर, मास्कची सक्ती, सामाजिक अंतर, तापमान तपासणी, हात-पाय धुण्याची व्यवस्था आदी सर्व नियम पाळून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. .
प्रत्येक रविवारी अन्नदात्यांनी बुकिंग केल्याप्रमाणे अन्नदान होते.ज्यांना अन्नदान करावयाचे,त्यांनी देवस्थानाजवळ त्या अन्नाचा खर्च (रु. ३५००)द्यावा लागतो.त्यासाठी अगोदरच नावनोंदणी करावी लागते.बुकिंग घेण्यास सुरुवात झाली असून एक महिन्यांचे आगावू बुकिंग झाले आहे या महाप्रसादाचा लाभ प्रत्येक रविवारी हजारो भाविक घेतात.अन्नदान केल्यानेच नाथ तेथे थांबले,अशी अख्यायिका आहे. त्यामुळे देवस्थानाजवळ अन्नदानाचे विशेष पुण्य लाभते.या उपक्रमास राज्यभरातून भाविक येथे येऊन अन्नदान नावनोंदणी करतात.नाव
नोंदणीसाठी देवस्थानच्या कोणत्याही विश्वस्त,कर्मचाऱ्यांना फोन करावा.किंवा www.bhairavnathtrust.org या वेबसाईटवर नोंदणी करावी.किंवा आॅनलाईन नावनोंदणीसाठी लिंक http://www.bhairavnathtrust.org/anadan हि आहे.इच्छुकांनी नावनोंदणी करण्याचे अवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS