अमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधार अटकेत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधार अटकेत

दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्या करण्यासाठी केले प्रवृत्त

अमरावती : नुपूर शर्माचे समर्थन करणार्‍या अमरावती येथील उमेश कोल्हे या युवकाची हत्या करणार्‍या मुख्य आरोपीला बेडया ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. इरफा

omg यूट्यूबवर १५९ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज एकदा बघाच!
 यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर
मताचे राजकारण करणार नाही – मोनिकाताई राजळे

अमरावती : नुपूर शर्माचे समर्थन करणार्‍या अमरावती येथील उमेश कोल्हे या युवकाची हत्या करणार्‍या मुख्य आरोपीला बेडया ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. इरफान शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी एक एनजीओ चालवतो आणि त्याने शमीम आणि त्याच्या मित्रांना त्याला मारण्यासाठी प्रवृत्त केले होते तसेच लॉजिस्टिक सपोर्टही दिला होता.
देशभरात नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटत असून, सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्माला माफी मागण्याचे निर्देश देखील दिले आहेत. मात्र नुपूर शर्माचे समर्थन करणार्‍यांच्या हत्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. अमरावतीतील हत्यप्रकरणी इरफान शेखला अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी सध्या सुरु आहे. इरफानने आरोपींना 10 हजार रुपये देण्याचे आणि कारमध्ये सुरक्षितपणे पळून जाण्यास मदत करण्याचे आश्‍वासन दिले होते अशी माहिती अमरावती एसीपी आरती सिंह यांनी दिली. उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी रात्री हत्या करण्यात आली होती. या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये अमरावती येथील दुकानदार उमेश कोल्हे यांची शाळेच्या इमारतीजवळ दुचाकीवरून आलेल्या तीन आरोपींनी वार करून हत्या केली. केमिस्टच्या हत्येच्या तपासासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एक पथक शनिवारी महाराष्ट्रातील अमरावती शहरात पोहोचले. भारतीय जनता पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे केमिस्टची हत्या झाल्याची भीती लक्षात घेऊन केंद्राने या प्रकरणाची एनआयए चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.केमिस्ट उमेश प्रल्हादराव कोल्हे (54) यांची 21 जून रोजी हत्या करण्यात आली होती आणि या हत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी यापूर्वीच सहा जणांना अटक केली आहे. एनआयएकडे आता हे प्रकरण गेल्यानंतर काय निष्पन्न होणार याकडे अमरावतीसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं आहे. मुदस्सीर अहमद उर्फ सोनू राजा शेख इब्राहिम, शारुख पठाण उर्फ बादशाहा हिदायत खान, अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तस्लीम, शोहेब खान उर्फ बुरिया साबीर खान, आतिफ रशीद आदिल रशीफ, डॉ युसूफ खान बहादूर खान अशी या आरोपींची नावे आहेत. कोल्हे यांनी भाजपच्या नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्याचा आरोप करत सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली.

आरोपी उमेशच्या अंत्यविधी कार्यक्रमातही सहभागी
अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्याप्रकरणानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर अनेक दावे केले जात आहेत. इतकेच नाही तर उमेश कोल्हे यांचे बंधु महेश यांनी अनेक आरोप केले. पोलिसांनी आतापर्यंत या हत्येतील एकून सात आरोपींना अटक केली असून हत्येचा मुख्य सुत्रधार देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. आता उमेश कोल्हे हत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. सात आरोपीतील एक आरोपी युसुफ खान आणि उमेश कोल्हे यांचे घरगुती संबंध असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.

COMMENTS