Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कान्हूर मेसाईच्या विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात 

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पार पाडली शिक्षकांची भूमिका

  शिक्रापूर प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाच सप्टेबर रोजी सर्वत्र शिक्षक दिन मोठ्या उत्साहात स

अर्थसंकल्प म्हणजे शब्दांचे फुलोरे – अजित पवारांची टीका
मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार प्रदान
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीला ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा

  शिक्रापूर प्रतिनिधी – भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाच सप्टेबर रोजी सर्वत्र शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न होत  असताना नेहमी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या कान्हूर मेसाई येथील विद्याधाम माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात समाप्प्न झाला असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत शिक्षक दिन साजरा केला आहे.

  कान्हूर मेसाई ता. शिरूर येथे विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली यावेळी प्राचार्य म्हणून आकाश घोलप, पर्यवेक्षक म्हणून अजिंक्य माळवदे, क्रीडाशिक्षक म्हणून भूमिका देशमुख, कलाशिक्षक म्हणून समृद्धी तळोले व साक्षी पडवळ, संगणक शिक्षिका म्हणून वैष्णवी बाबर, वरिष्ठ लेखनिक म्हणून ऋषिकेश पुंडे यांनी भूमिका पार पाडल्या असून विद्यालयाचे शिपाई मामा म्हणून कुणाल भोर, परशुराम मोहिते, वैभव उबाळे व साहिल चव्हाण यांनी कामगिरी बजावली दरम्यान विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका म्हणून पायल जाधव, सौरभ पोखरकर, प्रणव दळवी, श्रद्धा पिंगळे, सुप्रिया थिटे, वृषाली रुपनेर, रामदास रुपनेर, साक्षी नरवडे, रोहन भोकनळ, वैभव शिंदे, विशाल धुमाळ, ऋतुजा जाधव, अपेक्षा शेळके, तनुजा पुंडे, समीरा पटेल, प्रथमेश वाघोले, तनुजा ढगे, श्वेता भोकनळ, अजिंक्य बढेकर, गायत्री भंडारी, सिद्धी ढगे या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका समर्थपणे पार पाडली. तर विद्यालयातील कलाशिक्षक दिपक मोरे यांनी प्राचार्य अनिल शिंदे व पर्यवेक्षक किसन पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर विदयार्थी शिक्षक दिनाचे आयोजन केले होते. लहान वर्गातील मुलांनी अत्यंत लक्षपूर्वक साथ दिली असून ज्युनिअर कॉलेजच्या युवकांनी कधीकधी आपल्या सहकारी शिक्षक मित्राची चांगलीच फिरकी घेतली. मात्र या अनोख्या शिक्षक दिने खुप आनंद मिळाला असल्याचे वैभव शिंदे याने सांगितले.

COMMENTS