अबला महिला की पुरूष?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

अबला महिला की पुरूष?

स्त्रियांना अबला म्हणतो पण या अबला म्हणवून घेणाऱ्या काही स्त्रियांकडून भादंवि ४९८अ चा मनमुराद गैरवापर होऊ लागल्यामुळे पुरुषच सध्या अबला झाले आहेत असे

अर्बन बँक घोटाळा आणखी किती बळी घेणार?
पक्वानांच्या ताटात पालीची लघुशंका!
शेवट गोल्ड झाला! पण….

स्त्रियांना अबला म्हणतो पण या अबला म्हणवून घेणाऱ्या काही स्त्रियांकडून भादंवि ४९८अ चा मनमुराद गैरवापर होऊ लागल्यामुळे पुरुषच सध्या अबला झाले आहेत असे म्हटले तर अजिबात वावगे ठरणार नाही. जो पर्यंत पुरुषावर लावलेला खोटा आरोप रद्द केला   जात नाही तो पर्यंत त्यांना कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात या प्रक्रियेस ५ ते ७ वर्ष लागतात. आपल्या आयुष्यातील महत्वाची वर्षे तणावाखाली घालवतात. तो पर्यंत तो व्यक्ती मानसिक दृष्ट्या फार खचून जातो त्याचा न्याय व्यवस्थेवरील काय त्याचा स्वतःवर व स्वतःच्या नातेवाईक , मित्र मंडळी वर सुद्धा विश्वास राहत नाही, आयुष्यात कुणी नवीन आले तरी त्यांच्या वर सुद्धा विश्वास ठेवायला अवघड जाते . काही वेळा नैराश्य येऊन तो व्यक्ती स्वतःच आयुष्य सुद्धा संपवयाला मागे पुढे बघत नाही.अश्या वेळी भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १४ नुसार कायद्या समोर स्त्री पुरुष सर्व सामान आहे. या विधाना बद्दल तिरस्कार निर्माण होऊ लागतो.


हजार दोषी सुटले तरी चालतील पण एकाही निर्दोष माणसाला सजा होता कामा नये हे आपल्या न्याय व्यवस्थेचे अधिष्ठान आहे,याचा अर्थ काय, तर भारतीय दंड विधान कलमांसह त्यात्या राज्यातील पोलीस कलमांचा योग्य वापर व्हावा,जो खरा गुन्हेगार असेल अशा गुन्हेगाराविरूध्द भादंवि आणि राज्य पोलीस कलमान्वये गुन्हा दाखल होऊन निष्पक्ष तपास व्हावा. तसा तो झाला   दोषी व्यक्तीला दंडीत न्याय  करणे सोपे होते. मात्र आपल्याकडे अनेकदा हे घडताना दिसत नाही. बायस म्हणजे कायद्याच्या रक्षकांकडून पक्षपात केला जातो.

अर्थात सारेच पक्षपात करतात असे नाही अनेक सन्माननिय महानुभव आपले काम पोलीस मॕन्युअल आणि वर्दी परिधान करताना घेतलेल्या शपथेला जागून सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रिद सार्थ ठरवितात,म्हणून तर खात्यातील मंडळींचा पक्षपातीपणा चव्हाट्यावर येतो. पक्षपातीपणा करणाऱ्या मंडळींनाही शपथ मोडण्याची हौस नसते. समाजातील खल प्रवृत्ती खात्यातील अस्वस्थ,लालची मंडळींना अमिष दाखवून ब्रीद द्रोह करण्यास भाग पाडतात. आणि मग सुरू होतो खोटे गुन्हे दाखल करण्याचा पाताळयंत्री खेळ. अर्थात हा खेळ न्यायव्यवस्थेसमोर तग धरीत नाही हा भाग वेगळा.मात्र न्यायव्यवस्थेला न्याय करेपर्यंत जो कालावधी जातो तेव्हढा काळ एखाद्या निर्दोष व्यक्तीला प्रचंड मानसिक त्रास सोसावा लागतो. आर्थिक नुकसान ,सामाजिक पत ऱ्हास पावते हा भाग आणखी वेगळा. उमेदीची वर्ष वाया जातात. अनेक कुटूंब या मोडस आॕपरंडीने उध्वस्त केले आहेत.एकूण या परिस्थितीचा विचार करून सन्माननिय सर्वोच्च न्यायालयाने काही खटल्यांमध्ये अशा बळी पडलेल्या कायद्याच्या भाषेतील संशयीतांना दिलासा देणारी भुमिका घेऊन खल प्रवृत्तींना चपराक दिली आहे.कलम ४९८ तसेच कौटूंबिक हिंसाचार कायदा २००५ हा त्यापैकीच एक. या कलमांचाही वापर बहुतांश वेळा खोट्या उद्देशाने ,नवरोबांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातो. विवाह म्हणजे आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो.

दोन व्यक्ती सामाजिक, भावनिक, शारीरिक दृष्ट्या जवळ येतात आणि पती पत्नी असा एक नाजूक सुंदर नाते बनते .विवाहामुळे पती-पत्नीच नव्हे तर दोन परिवार देखील एकत्र येतात. पती पत्नीचे नाते आनंदाने फुलू लागते पुढे ते पती पत्नी न राहता आई बाबा होतात त्यांच्या एक स्वतःच एक छोट कुटुंब बनते . या विवाह मध्ये बऱ्याच वेळा चढ उतार येत असतात पती पत्नी मध्ये भांडण होतात तर कधी सासरच्या मंडळीं कडून हुंड्या साठी छळ केला जातो.अशा वेळी भादंवि ४९८ अ  नुसार त्या महिलेची फिर्याद घेतली जाते त्या महिलेच्या पतीस व तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध विनाचौकशी अजामीन पात्र गुन्हा दाखल करून घेतला जातो. पुढे या सगळ्यांवर आरोप सिद्ध होई पर्यंत ते गुन्हेगार असो वा नसो त्यांच्यावर गुन्हेगाराचा शिक्का बसतो ज्यामुळे त्यांना भयंकर मानसिक तणावाचा सामना करावा लागतो . मोठे अधिकारी, डॉक्टर ,इंजिनिअर ,शिक्षक पत्रकार  तसेच समाजातील इतर प्रतिष्ठीत या सारख्या पदावर असलेले व्यक्ती या ४९८ मध्ये अडकलेले दिसतात .

तेंव्हा असे विचार येतात कि ही लोक सुशिक्षित चांगल्या पदावर नौकरी करतात चांगला पगार असताना सुद्धा हुंडा खरंच मागत असतील का? आणि मागत असतील तर का ? अशाच काही वाचनातून काही अनुभवलेल्या घटनेतून दिसून आले कि बऱ्याच वेळा फक्त अहंकार दुखावला गेल्यामुळे तसेच पतीस आणि सासरच्या लोकांना उगाच त्रास देण्यासाठी आणि त्यांच्या कडून भरमसाठ रक्कम लाटण्यासाठी तसेच समाजात त्या लोकांची बदनामी करण्यासाठी असा खोटा बनावट गुन्हा दाखल केला जातो . समाजात आपली बदनामी होऊ नये ४९८ सारख्या फौजदारी गुन्ह्या मध्ये अडकू नये म्हणून काही लोक कोर्टाबाहेरच आहे ती रक्कम मोजतात.एखाद्या महिलेवर अत्याचार झाला तिचा अधिकार डावलला गेला तर अनेक संस्था अनेक मदतीचे हात पुढे येतात. पण जेंव्हा अशा काही महिलांच्या अत्याचाराचे बळी पडणारे सासरचे मंडळी असतात त्यांसाठी कुणीच पुढे का येत नाहीत.? काही दिवसांपूर्वी फेसबुक वर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यात एक सून आपल्या सासूला मारत आहे ,तर दुसऱ्या व्हिडीओ मध्ये सासऱ्याला सुज येई पर्यंत मारहाण करत आहे . हे व्हिडीओ आपण पाहतो कमेंट करतो असं नको व्हायला हवं यासारख्या कमेंट केल्या जातात. या कमेंटचा काय फायदा ? पत्नी पीडित, सून पीडितांच्या हक्कांसाठी, मदतीसाठी का कुणी आवाज उठवत नाही ?स्त्रियांना अबला म्हणतो पण या अबला म्हणवून घेणाऱ्या काही स्त्रियांकडून भादंवि ४९८अ चा मनमुराद गैरवापर होऊ लागल्यामुळे पुरुषच सध्या अबला झाले आहेत असे म्हटले तर अजिबात वावगे ठरणार नाही. जो पर्यंत पुरुषावर लावलेला खोटा आरोप रद्द केला   जात नाही तो पर्यंत त्यांना कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात या प्रक्रियेस ५ ते ७ वर्ष लागतात. आपल्या आयुष्यातील महत्वाची वर्षे तणावाखाली घालवतात. तो पर्यंत तो व्यक्ती मानसिक दृष्ट्या फार खचून जातो त्याचा न्याय व्यवस्थेवरील काय त्याचा स्वतःवर व स्वतःच्या नातेवाईक , मित्र मंडळी वर सुद्धा विश्वास राहत नाही, आयुष्यात कुणी नवीन आले तरी त्यांच्या वर सुद्धा विश्वास ठेवायला अवघड जाते . काही वेळा नैराश्य येऊन तो व्यक्ती स्वतःच आयुष्य सुद्धा संपवयाला मागे पुढे बघत नाही.

अश्या वेळी भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १४ नुसार कायद्या समोर स्त्री पुरुष सर्व सामान आहे. या विधाना बद्दल तिरस्कार निर्माण होऊ लागतो.या समानतेचा बट्याबोळ करणारे आणखी एक उदाहरण आहे.लग्न होऊन दोन वर्ष झाली,लग्नानंतरच्या काही दिवसातच पतीपत्नी वेगळे राहू लागले.दोन वर्षात पतीने न्यायालयात घटस्फोटाचा दावाही दाखल केला.बराच कालावधी लोटल्यानंतर पती आणि कुटूंबियांविरूध्द ४९८ अ आणि कौटूंबिक हिंसाचार कायदा २००५ अन्वये पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे.काय म्हणणार या प्रवृत्तीला. महिला म्हणून मिळालेल्या हक्कांचा , अधिकाराचा गैर वापर करणाऱ्या महिलांना सुद्धा कठोर शासन व्हायला पाहिजे अशा वेळी महिला म्हणून तिला का झुकते माप द्यावे ? समता, समानता कायद्यामध्ये दिसून येत नाही. केवळ ४९८ च नाही तर इतर अनेक कलमांखाली अशा पध्दतीने खोटे गुन्हे दाखल होत असल्याने अनेक निर्दोष व्यक्तींचे आयुष्य उध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत,यासंदर्भातही दखल घेऊच, मात्र वर सांगीतल्याप्रमाणे ४९८ या कलमाखाली   होणारी लूटमार कुठे तरी थांबली पाहिजे, यासाठी सुद्धा कायदा असायला हवाच.Stop extortion and Blackmailing under 498 A Not every women is victim Not every man is Criminal.

COMMENTS