अफगाणच्या आड पानिपतची तयारी तर नाही ना ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

अफगाणच्या आड पानिपतची तयारी तर नाही ना ?

पानिपतच्या जखमा अजूनही अधूनमधून ठणकत असताना अफगाणीस्तानमधील तालीबानी गोंधळांमुळे ऐरणीवर आलेला निर्वासीतांचा प्रश्न भारतासाठी पुन्हा एकदा डोकेदुःखी ठर

बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडून मलिकांनी घेतली कोट्यवधींची जमीन : फडणवीस यांचे आरोप
छत्रपती प्रतिष्ठानच्या पारितोषिकांचे 9 एप्रिलला वितरण
कोपरगांव मुर्शतपुर शिवारात प्रथमच नागवेली पान लागवडीचा प्रयोग

पानिपतच्या जखमा अजूनही अधूनमधून ठणकत असताना अफगाणीस्तानमधील तालीबानी गोंधळांमुळे ऐरणीवर आलेला निर्वासीतांचा प्रश्न भारतासाठी पुन्हा एकदा डोकेदुःखी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भारताच्या उदारमतवादी धोरणाचा फायदा घेऊन आश्रीत मंडळी पाठीत खंजीर खुपसतात हा भारताचा अनुभव इतिहास वारंवार ताजा करताना दिसतो. नजीब अशाच पध्दतीने मल्हारराव होळकरांच्या आश्रयास आला आणि  त्याने पानिपत घडवले हे भारताला विसरता येणार नाही. इतिहास केवळ स्मृती जतन करण्यासाठी नव्हे तर धडा घेऊन चुका सुधारण्यासाठी वापर करण्यातच खरा शहाणपण आहे.
दखलचा शिर्ष मथळा वाचल्यानंतर पानिपतचे ऐतिहासिक युध्द आणि अफगाणीस्तानमधील विद्यमान परिस्थिती या दोघांचा काय संबंध? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो.इतिहासातून काहीच शिकायचे नाही का? हा प्रतिप्रश्न त्या मुळ प्रश्नाला उत्तर आहे.भारत वर्षाच्या मातीत रूळलेला उदारमतवाद आणि चांगूलपणा या गुणांमुळे जागतिक पातळीवरील फुटीरवादी चळवळीने या देशाच्या भुभागावर सातत्याने आक्रमण करून वर्चस्व प्रस्थापीत करण्याचा नाठाळपणा केला आहे.भारतीय संस्कृती मुळात सहिष्णू.दुसऱ्याचे डोळे अश्रूंनी पाणावलेले आम्हा भारतीयांच्या भावनांना नेहमीच सदगतीत करतात.या मानवतेनेच  भारतभूमीचे स्वातंत्र्य नेहमीच धोक्यात आणले आहे.आपले आश्रीत म्हणून आलेल्या मंडळींचे कुटील कारस्थान आपल्या भावनांच्या लक्षात येत नाही.आणि जेंव्हा आपले डोळे उघडतात तेंव्हा या आश्रीतांनी आपले वर्चस्व प्रस्थापीत केलेले असते.इतिहासात असे अनेक दाखले पहायला मिळतात.पानिपत हे त्यापैकी एक ठळक उदाहरण.नजिब खान हा पानिपत युध्दाआधी मल्हारराव होळकरांच्या आश्रयाला आला.मराठा सरदारांचा उदारमतवाद,आश्रीताला जीवदान देण्याचे दातृत्व जाणून असलेल्या मुघल सम्राटाने मल्हाररावांच्या चांगुलपणाचा फायदा घेतला आणि शेवटी पाठीत खंजीर खुपसून पानिपत घडवून आणले,तेथपासून विश्वास या शब्दाची जागा पानिपत या शब्दाने घेतली.एव्हढा प्रचंड घात करणारा हा चांगूलपणा प्रसंगी कसा जीवघेणा ठरू शकतो हा धडा आजच्या भारतीय राजकारण्यांनी घ्यायला हवा.
तालिबानी उठावानंतर अफगाणीस्तान मधील नागरिकांची उडालेली दाणाफाण अन्य राष्ट्रांमध्ये आश्रय शोधू लागेल.जगाच्या पाठीवरील अनेक राष्ट्रे मानवतेचा दृष्टीकोन ठेवून या नागरिकांना निर्वासीत म्हणून आपल्या देशात आश्रयही देतील.या स्पर्धेत भारत अग्रस्थानी असेल यात मुळीच शंका नाही, पण हेच आश्रीत देशाच्या सार्वभौमत्वाला कसा सुरूंग  लावतात याबाबत भारताइतका प्रगल्भ अनुभव कुणालाही नाही.म्हणूनच दुधाने जीभेला चटके बसल्यानंतर ताकही फुंकून प्यावे ही पुर्वजांची शिकवण लक्षात घेऊन अफगाण निर्वासीतांबाबद भारताने  विचार करायला हवा.
गेल्या काही वर्षांतील आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहिल्यानंतर थंड डोक्याने अनेक षडयंत्री योजना राबविण्याचे काम धर्मांध शक्ती करीत असल्याचे दिसते.सिरीया या इस्लाम  देशात इसीस या आतंकी संघटनेने प्रचंड आतंक माजवल्यानंतर लाखो सिरीयन नागरीक युरोपात पळाले आणि तिथे निर्वासीत म्हणुन आश्रीत आहेत. लाखो रोहिंगे भारतात निर्वासीत म्हणून आले आहेत, रोजगाराच्या निमित्ताने लाखो बांगलादेशी भारतात घुसले आहेत.अफगाणीस्तानातुनही असेच असेच लोंढे बाहेर पडताहेत.हेही निर्वासित म्हणून येणार, मानवतेचा कळवळा दाखवून आपण आश्रय देणार.धरमबांधव त्यांना आश्रय मिळावा म्हणून उचलही घेतील.आंदोलन होणार,प्रसंगी हिंसक वळणही लावणार.रोहींग्यांच्या समर्थनार्थ झालेल्या दंगली आठवा.सारे दृश्य नजरेसमोर येईल.अफजलगुरूचा किस्साही उत्तम उदाहरण आहे. आयसीस ,बोको हराम,जैश ,सिमी,तेहरिक ए तालिबान,लष्कर ए तोयबा, तालिबान टोळ्या,अल कायदा या सर्वांचे ध्येय एकच आहे जगभरात  आपला धर्मप्रचार व प्रसार करणे इस्लामचे राज्य जगावर प्रस्थापीत करणे. तालिबान यापेक्षा वेगळे काय करतंय ? ते कुराण व हदीस या पुस्तकात लिहिलेले शरीयत कायदे लागु करण्याचा प्रयत्न त्या देशात सुरू आहे.मग  तिथुन अफगाणी नागरिक पलायन का करतात.तालिबानी राजवट बहुपत्नीत्व,हलाला,तोंडी तलाक,बुरखा,दाढी, स्त्री पुरुष वर्तन सगळे त्यांच्याच ग्रंथामध्ये लिहिलेले नियम पाळा सांगत आहे,मग अफगाण मुस्लिम नागरिकांना आपल्या धर्मग्रंथात सांगीतलेल्या कायद्यांची  भिती  का वाटतेय? धर्मबांधव तालिबान्यांची की शरियत धर्मग्रंथातील नियमांची?म्हणूनच हा एक सुनियोजीत कट असल्याची शंका घेण्यास पुरेसा वाव आहे.कदाचीत नजिब खानासारखे भारताच्या आश्रयाला येऊन आणखी एखादे पानिपत घडवायचे षडयंत्र तर नाही ना ,याचा शोध घेऊनच भारात सरकारने अफगाण निर्वासीतांचा प्रश्न हाताळणे योग्य ठरेल.बाकी मानवता आपल्या जागी ठिक आहे.

COMMENTS