अपघाताची संख्या कमी करण्यासाठी इंटिग्रेटेड रोड ऑक्सिडेंट डेटाबेस अँड्रॉईड अ‍ॅप

Homeमहाराष्ट्रसातारा

अपघाताची संख्या कमी करण्यासाठी इंटिग्रेटेड रोड ऑक्सिडेंट डेटाबेस अँड्रॉईड अ‍ॅप

गर्व्हमेंट ऑफ इंडिया आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचा इंटिग्रेटेड रोड ऑक्सिडेंट डेटाबेस (आयआरएडी) हे अ‍ॅड्रॉईड अ‍ॅप राबविण्यात येणार आहे.

दहा दिवसांच्या बाप्पासाठी मनपा कडून झाडावरच करवत….  
पैशाच्या वादातून केला मोठ्या भावाचा खून
 लव्ह जिहादच्या विरोधात सकल हिंदू जन आक्रोश मोर्चा


सातारा / वार्ताहर : गर्व्हमेंट ऑफ इंडिया आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचा इंटिग्रेटेड रोड ऑक्सिडेंट डेटाबेस (आयआरएडी) हे अ‍ॅड्रॉईड अ‍ॅप राबविण्यात येणार आहे. या अ‍ॅपचे मुख्य उद्दिष्ट देशाची रस्ते सुरक्षा वाढवणे हे असून एनआयसी आणि आयआयटी मद्रास यांनी संयुक्तपणे यावर काम केले आहे.आयआरएडी अ‍ॅप्लिकेशन अँण्ड्राइड असून, प्रत्येक अपघातानंतर घटनास्थळी भेट देणारे पोलिस अधिकारी, अंमलदारांना अपघाताचे छायाचित्र, व्हिडिओ शूटिंग अपलोड करण्याची सोय त्यामध्ये केली आहे. त्यामुळे गुगल लोकेशन क्लिक केल्यामुळे अपघाताचे घटनास्थळ योग्य प्रकारे निश्‍चित करण्यास मदत होणार आहे.जिल्ह्यातील 29 पोलिस ठाण्यातील 108  अपघाताची नोंद झाली आहे. यासाठी पोलिसांना एनआयसीतर्फे प्रशिक्षण दिले गेले आहे. या अ‍ॅपसाठी नोडल अधिकारी म्हणून पोलीस उपनिरिक्षक अंतम खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एनआयसीचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी संजय गुमास्ते यांनी या विषयी माहिती दिली.

COMMENTS