अनिल अंबानी यांच्या मुलाचे टाळेबंदीवर ताशेरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनिल अंबानी यांच्या मुलाचे टाळेबंदीवर ताशेरे

उद्योगपती अनिल अंबानी यांचे सुपुत्र अनमोल अंबानी यांनी महाराष्ट्रातील अंशतः टाळेबंदीवर ताशेरे ओढले आहेत.

नव्या वर्षात नवे निर्बंध…आता उपस्थिती फक्त 50 ; प्रशासनाचा निर्णय
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात अभिवादन
ओबीसी आरक्षण वाचवले नाही तर, तीव्र आंदोलन उभारू

मुंबई/प्रतिनिधीः उद्योगपती अनिल अंबानी यांचे सुपुत्र अनमोल अंबानी यांनी महाराष्ट्रातील अंशतः टाळेबंदीवर ताशेरे ओढले आहेत. राजकीय नेते रॅलीचे आयोजन करत आहेत आणि चित्रपटांचे शूटिंगही सुरू आहे; पण उद्योगांवर कठोर निर्बंध लादले आहेत, असे खोचक ट्वीट अनमोल यांनी केले आहे. 

थेट अंबानी कुटुंबातून टाळेबंदीवर टीका झाल्याने याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्यात सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंधांना सुरुवात झाल्यानंतर अनमोल अंबानी यांनी एक ट्वीट केले आहे. अत्यावश्यक सेवा म्हणजे नेमके काय? कलाकार शूटिंग करत आहेत. राजकीय नेते मोठ्या संख्येने रॅली काढत आहेत; पण तुमचा उद्योग आणि काम हे अत्यावश्यक नाही! प्रत्येक व्यक्तीला त्याचे काम अत्यावश्यक असते, असे त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS