अत्याचारप्रकरणी फोक्सो कायद्यानुसार एकास अटक

Homeमहाराष्ट्रसातारा

अत्याचारप्रकरणी फोक्सो कायद्यानुसार एकास अटक

राजुरी येथील अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने 9 महिन्यांपूर्वी आमिष दाखवून तिच्याबरोबर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी आरोपीविरुध्द पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

नगरमध्ये दंगली घडवण्याचे षडयंत्र शिजत आहे काय? : शहर काँग्रेसची पोलिसांना विचारणा
पुरोहितांची तुंबळ मारामारी…मग आता कोणाच्या शांतीची गरज आहे? l
दुष्काळी कान्हूर भागातून गोशाळेला पाच ट्रक चारा

फलटण /प्रतिनिधी : राजुरी येथील अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने 9 महिन्यांपूर्वी आमिष दाखवून तिच्याबरोबर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी आरोपीविरुध्द पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार , सप्टेंबर 2020 महिन्यामध्ये राजुरी तालुका फलटण येथील अल्पवयीन मुलगी हिला कोणीतरी अज्ञात इसमाने मागील 9 महिन्यापुर्वी अज्ञात ठिकाणी नेऊन कशाचे तरी अमिष दाखवुन, ती साधारणतः 17 वर्षाची अल्पवयीन असताना तिच्या बरोबर जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. त्यामध्ये ती गरोदर राहिली. तिची दि. 14/5/2021 रोजी मातृछाया नर्सिंग होम वारजे माळवाडी पुणे शहर येथे प्रसुती झाली असल्याची फिर्याद पुणे शहर पोलीस स्टेशन येथे देण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास होणे कामी ही फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास सपोनि अक्षय सोनवणे हे करत आहेत. तपासामध्ये आरोपी निषन्न झाल्याने त्यास अटक करणेत आली आहे.

COMMENTS