वीकएंड लॉकडाऊनला  पुणेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीकएंड लॉकडाऊनला पुणेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

राज्यात शनिवार आणि रविवार दोन दिवस वीकएंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

बंगळुरूमध्ये पबला भीषण आग
महसूलचे जुने कायदे बदलून प्रशासन लोकाभिमुख करणार; महसूलमंत्री बावनकुळे यांची माहिती; शिर्डीत घेतला जनता दरबार
श्रीराम मंदिर देणगी प्रकरणी एसआयटीची पुनर्रचना करा : सर्वोच्च न्यायालय

पुणे/प्रतिनिधी: राज्यात शनिवार आणि रविवार दोन दिवस वीकएंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातही वीकएंड लॉकडाऊनला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. शहर आणि उपनगरतील प्रमुख रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

बाहेर पडलेल्या नागरिकांची विचारपूस पोलिस करीत होते. पुणे महापालिकेच्या आदेशानुसार सुरुवातीला सोमवार ते शुक्रवार दिवसभर जमावबंदी आणि रात्री संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्येही बदल करून हे पाच दिवस फक्त अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. अशा परिस्थितही पुणेकर घराबाहेर पडत होते; पण आज वीकएंड लॉकडाऊनला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद असल्याचे चित्र होते. पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाटयाने वाढू लागले आहेत. नागरिकांना रुग्णालयात बेड मिळणेही कठीण झाले आहे. त्यातच कालपासून लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. सद्यस्थितीत दिवसाला पाच हजारांच्या घरात रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर पुणेकरांनी वीकएंड लॉकडाऊनला गांभीर्याने घेतले आहे. स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन अशा वर्दळीच्या चौकात तुरळक वाहने दिसून आली. मध्यवर्ती भागातील टिळक, केळकर, लक्ष्मी, शिवाजी रस्त्यांबरोबरच, कर्वे, सिंहगड, जंगली महाराज रस्त्यांवर शुकशुकाट होता. 

COMMENTS