थाळ्या, टाळ्या पुरे, आता लस द्या ; राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थाळ्या, टाळ्या पुरे, आता लस द्या ; राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा

385 दिवसातही कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकता आलेले नाही. उत्सव, टाळ्या-थाळ्या आता खूप झाल्या.

जनआरोग्य समितीच्या अध्यक्षपदी नगरसेविका विजया देवकर  
झगडे फाटा–रांजणगाव देशमुख रस्त्यासाठी १७ कोटीकाम दर्जेदार व्हावे; नागरिकांची सार्वजनिक बांधकामकडे मागणी
समताच्या सेल्फ बँकिंग विड्रॉल सुविधेचा शुभारंभ

नवी दिल्ली : 385 दिवसातही कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकता आलेले नाही. उत्सव, टाळ्या-थाळ्या आता खूप झाल्या. आता लोकांना लस द्या, असा खोचक टोला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला आहे. राहुल यांनी एक ट्वीट केले आहे. 

त्यात त्यांनी म्हटले आहे, की सरकारच्या धोरणांमुळेच देशातील प्रत्येक वर्ग त्रस्त आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. दुसरीकडे लसींची कमतरता जाणवत आहे. शेतकरी-मजदूर संकटात आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. छोटे उद्योग धंदे बंद होत आहेत. मध्यमवर्गही त्रस्त झाला आहे. लसींची निर्मिती करणार्‍यांना आवश्यक ती साधनसामुग्री पुरवली पाहिजे. त्यांना सुविधा द्या, म्हणजे लसीचे उत्पादन वाढेल. सध्याच्या गतीने लसीकरण सुरू राहिले, तर 75 टक्के लोकसंख्येचे लसीकरण करण्यासाठी अनेक वर्षे लागतील. काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्रातील सरकार कधी लसीकरण मोहिमेला उत्सव म्हणते, तर कधी हे दुसरे युद्ध असल्याचे सांगितले जाते. नेमके हे काय आहे? असा सवाल चिदंबरम यांनी केला आहे. मोदी यांनी पहिल्यांदा टाळेबंदीची घोषणा केली होती, तो दिवस आठवा. त्या दिवशी त्यांनी महाभारताचे युद्ध 18 दिवसांत जिंकण्यात आले होते. कोरोना विरोधातील युद्ध 21 दिवसात जिंकू असे म्हटले होते. त्या युद्धाचे काय झाले, असा सवाल चिदंबरम यांनी केला आहे. पोकळ दावे, वायफळ बडबड आणि मोठमोठ्या गप्पा झोडल्याने कोरोना संसर्गाच्या विरोधात यश मिळणार नाही. आपले अपयश लपवण्यासाठीच सरकार लसीचा पुरवठा आणि वितरणाचे नियोजन व्यवस्थित करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला

COMMENTS