गृहमंत्री अमित शाह   बेपत्ता असल्याची तक्रार

Homeताज्या बातम्या

गृहमंत्री अमित शाह बेपत्ता असल्याची तक्रार

’नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडिया’ (एनएसयूआय) संघटनेचे सरचिटणीस नागेश करियप्पा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बेपत्ता असल्याची तक्रार दिल्ली पोलिसांत दाखल केली

सद्गुरू किसान बाबा व नवनाथ बाबा यांचे अनंत उपकार-ह.भ.प. अक्षय महाराज पिंगळेश्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे पौर्णिमेनिमित्त हरिकीर्तन उत्साहात संपन्न
जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या मुलाला जन्मठेप | LOKNews24
लग्नाच्या जेवणात पनीर नसल्यानं वऱ्हाड्यांमध्ये राडा

नवी दिल्ली : ’नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडिया’ (एनएसयूआय) संघटनेचे सरचिटणीस नागेश करियप्पा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बेपत्ता असल्याची तक्रार दिल्ली पोलिसांत दाखल केली आहे. अशा संकट प्रसंगी पळून न जाता देशवासीयांची काळजी घेणे आणि सेवा करणे हे राजकीय व्यक्तीचे काम असल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 

    शाह बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिस करियप्पा यांची चौकशी करण्यासाठी आल्याचा दावा एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते लोकेश चूग यांनी केला. 2013 पर्यंत राजकीय नेते नागरिकांना उत्तरासाठी बाध्य होते; परंतु भाजप सत्तेत आल्यानंतर मात्र हे चित्र पालटले. महामारीसारख्या कठीण काळात पंतप्रधानपदानंतर दुसर्‍या अतिशय महत्त्वाच्या पदावर असलेली व्यक्ती मात्र गायब झाली आहे, असेही चुग यांनी म्हटले. देशातील सर्वच जण अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहेत. अशा काळात नागरिकांना आधार देणे आणि जबाबदारी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे; परंतु सद्य सरकार मात्र यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे ’एएसयूआय’ने गृहमंत्री बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. सरकार देशाच्या प्रश्‍नांची उत्तरे लवकरात लवकर देईल, अशी आशा आहे, असेही ’एनएसयूआय’ने आपल्या निवेदनात म्हटले.

COMMENTS