घटस्थापनेला राज्यभर आनंदोत्सव साजरा करत देवाच्या दर्शनाला जाणार- भाजपची घोषणा (Video)

Homeमहाराष्ट्र

घटस्थापनेला राज्यभर आनंदोत्सव साजरा करत देवाच्या दर्शनाला जाणार- भाजपची घोषणा (Video)

गेल्या सहा महिन्यांपासून जुलमी आणि अधर्मी ठाकरे सरकारने आमच्या देवी-देवतांना कडी कुलुपात बंद करुन ठेवले होते. पण आमच्या संघर्षामुळे या महिषासुर सरकार

सहकार चळवळ मागे का पडली? हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले?-अमित शाह | LokNews24
बांग्लादेशात उद्या तारिक रहमान यांचा शपथविधी
बा…विठ्ठला ! शेतकरी, कष्टकरी वर्गावरील संकटे दूर कर !

गेल्या सहा महिन्यांपासून जुलमी आणि अधर्मी ठाकरे सरकारने आमच्या देवी-देवतांना कडी कुलुपात बंद करुन ठेवले होते. पण आमच्या संघर्षामुळे या महिषासुर सरकारला आम्ही वठणीवर आणले. आणि आता घटस्थापनेला मंदिराचे टाळे उघडणार आहेत. हा दिवस आम्ही आनंदाने साजरा करणार आहोत. राज्यभरातील सर्व मंदिरामध्ये आमचे कार्यकर्ते ढोल ताशा, घंटा, शंख वाजवत गुलालाची उधळण करत देवाच्या दर्शनाला जातील. आम्ही देवाला प्रार्थना करु की या अधर्मी सरकारला बुद्धी द्यावी, अशा शब्दात भाजपचे अध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. काय म्हणालेत तुषार भोसले पाहुयात… 

COMMENTS