माजलगाव प्रतिनिधी - तथागत भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा घेऊन आज ग्रामीण भ

माजलगाव प्रतिनिधी – तथागत भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा घेऊन आज ग्रामीण भागात तळागाळात सर्वसामान्य कार्यकर्ते तन-मन-धनाने निस्वार्थी आणि स्वाभिमानाने कार्य करतात . अशा सामान्य कार्यकर्त्यांची दखल सामाजिक समता अभियान चे घेऊन बहुजन नायक पुरस्कार 2023 प्रदान केला. हा पुरस्कार सामान्य कार्यकर्त्यांचा केलेला बहुमान हा कार्याला ऊर्जा देणारा आहे. व युवकांनी चळवळ गतिमान करण्यासाठी पुढे यावे.असे प्रतिपादन सर्वजीत बनसोडे यांनी मुख्य मार्गदर्शनपर बोलताना मत व्यक्त केले.
माजलगाव येथे सामाजिक समता अभियान च्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त बहुजन नायक पुरस्कार 2023 व एक दिवशीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषद चे उपशिक्षण अधिकारी मा नानाभाऊ हजारे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक समता अभियान चे अध्यक्ष प्रवीणकुमार डावरे , तर उद्घाटक म्हणून चिंचाणे साहेब होते . याप्रसंगी विशेष उपस्थितीमध्ये कार्याध्यक्ष प्रा.डा. विठ्ठल जाधव , महासचिव प्रा. शशिकांत जावळे,सोमनाथ चांदमारे , बाळासाहेब सोनसाळे, धर्मानंद साळवे चरणराज ढोकणे, स्वागताध्यक्ष विजय राऊत, संयोजक तालुकाध्यक्ष अरविंद लोंढे यांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडला. बहुजन नायक पुरस्कार व एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या अनुषंगाने युवक परिषदेच्या अनुषंगाने सर्वजीत बनसोडे यांनी मार्गदर्शन करताना युवक ही चळवळीची ताकद असते म्हणून युवकांनी आंबेडकर चळवळ गतीमान करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानलेल्या सिद्धांतानुसार व भविष्यातील वेध घेऊन दिशा ठरवली पाहिजेअसे प्रतिपादन केले . ज्ञतर सामाजिक समता अभियानाचे अध्यक्ष प्रवीण कुमार डावरे यांनी आपल्या अध्यक्षीय समारोप मध्ये हा पुरस्कार म्हणजे फक्त सत्कार नसून ती एक सामाजिक जाणीवीची जबाबदारी आहे असा संदेश दिला . तर सामाजिक समता अभियान हे तरुणांचे नेतृत्व निर्माण करण्यासाठी तरुणांना बळ देण्यासाठी कार्य करणारी संघटना आहे. अनेक उदाहरण देऊन सामाजिक समता अभियान या युवकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असे प्रास्ताविकात सामाजिक समता अभियानचे महासचिव प्राध्यापक शशिकांत जावळे यांनी व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे प्रभाकर साळवे प्रा. धम्मानंद बोराडे, ,अशोक मगर, शत्रुघ्न कस्बे अशोक राठोड पांडुरंग जाधव, बाबा जाधव, प्रशांत बोराडे, डॉ. गणेश खेमाडे राहुल वाघमारे भगवान ससाने अशोक कांबळे अमर साळवे बाळू निर्मळ ढगे साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय डावरे ,सचिन वाहुळे नितीन डावरे कुमार जावळे संतोष टाकणखार, सुमित लोंढे , यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक समता अभियान चे तालुकाध्यक्ष आयुष्यमान अरविंद लोंढे यांनी केले तर आभार प्रदर्शन धम्मानंद बोराडे यांनी मानले.
COMMENTS