विद्यार्थ्यांसाठी युवासेना नेते पूर्वेश सरनाईक यांचा वंडर ठाणे उपक्रम 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांसाठी युवासेना नेते पूर्वेश सरनाईक यांचा वंडर ठाणे उपक्रम 

ठाणे प्रतिनिधी- नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र या नाताळ सणासाठी ठाण्यातील उपवन परिसरात ठाणे युवासेना नेते पूर्वेश सरनाईक यांनी एक

स्टेट बँकेच्या शाखेत महिलांची चेंगराचेंगरी
छत्रपती संभाजी महाराजांनी समाज उभारणीचे काम केले -आ शंकरराव गडाख
निवडणूक चुरस आणि सामाजिक अन्याय !

ठाणे प्रतिनिधी– नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र या नाताळ सणासाठी ठाण्यातील उपवन परिसरात ठाणे युवासेना नेते पूर्वेश सरनाईक यांनी एक अनोखा आणि आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. सध्या नाताळ निमित्त विद्यार्थ्यांना सुट्ट्या आहेत. या विद्यार्थ्यांसाठी वंडर लँड ठाणे असा उपक्रम पूर्वेस यांनी आयोजित केला आहे. मनात एक संकल्पना आली आणि ठाण्यात पहिल्यांदाच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. यावेळी आकर्षक असे ४० फुटाचे ख्रिसमस ट्री देखील उभारण्यात आला आहे. यावेळी अनेक गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी देखील मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक आणि शालेय जीवनातील वस्तू पुरवण्याचं काम करण्यात येणार असल्याचे पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले. सांस्कृतिक आणि पर्यावरण पूरक उपक्रम असल्याने शासनाकडून जे सहकार्य लागेल ते सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.

COMMENTS