पाथर्डी/ प्रतिनिधी : शहरातील प्रभाग क्र.चार मधील विजयनगर,मुंडेनगर रस्ता,नाथनगर पूर्व बाजू,नवीपेठ,आखार भाग या ठिकाणी नगरपरिषदेचे एलईडी पथदिवे बंद पडल्
पाथर्डी/ प्रतिनिधी : शहरातील प्रभाग क्र.चार मधील विजयनगर,मुंडेनगर रस्ता,नाथनगर पूर्व बाजू,नवीपेठ,आखार भाग या ठिकाणी नगरपरिषदेचे एलईडी पथदिवे बंद पडल्याची दखल युवा नेतृत्व प्रशांत शेळके यांनी घेत संबंधित ठिकाणी माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्वखर्चाने बारा पथदिवे गुरुवारी बसवण्यात आले.तसेच आखरभाग येथील नादुरुस्त केबल ही यावेळी बदलण्यात आली.
यावेळी बोलताना प्रशांत शेळके यांनी म्हटले की,माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके यांचा समाजकारणाचा वारसा आपल्याला पुढे घेउन जाण्याचे काम भविष्यात करायचे आहे.पद असो नसो आमची नाळ ही सामान्य जनतेशी जोडली गेलेली आहे.यापुढील काळात कुठल्याही प्रभागातील अडचण असल्यास संपर्क साधण्याचे आवाहान यावेळी त्यांनी केले.नगरपरिषदेचा कार्यकाळ संपून दहा महिने उलटले असून सध्या पालिकेचे कामकाज प्रशासकामार्फत चालत असून अनेक प्रभागात कामे रखडत असून नागरिकांमधून नाराजीचा सूर निघत असताना मात्र प्रभाग क्र.चार मधील पथदिवे हे दीड महिन्यापासून बंद अवस्थेत होते.याची दखल युवा नेतृत्व प्रशांत शेळके यांनी घेत हा प्रश्न मार्गी लावल्याने नागरिकांमधून त्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.
COMMENTS