कर्जत प्रतिनिधी - विजेच्या धक्क्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथे घडली आहे. बहिरोबावाडी - चिंचोली

कर्जत प्रतिनिधी – विजेच्या धक्क्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथे घडली आहे. बहिरोबावाडी – चिंचोली फाटा दरम्यान वस्तीनजीकच्या शेतात बुधवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
चेतन सुरेश शिंगाडे, वय : २० असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. शेतात काम करत असताना ही दुर्घटना घडली. शेतात लोंबकळत असलेल्या विजेच्या तारांमुळे ही दुर्घटना झाली. मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते सुनील यादव यांच्यासह कुटुंबीय व ग्रामस्थांनी महावितरणला जबाबदार धरत मृतदेह ताब्यात घेतला नाही. महावितरणचे अभियंता दत्तात्रय सांगळे यांनी २० रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिला व पुढील मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
COMMENTS