Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धरणात बुडून युवकाचा मृत्यू

देवळाली प्रवरा : अहिल्यानगर येथील पाच तरुण सुट्टी असल्याने रविवारी (दि. ८) दुपारच्या दरम्यान मुळा धरण येथे फिरण्यासाठी आले होते. पाणी पाहुन त्यांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही. ते खोल पाण्याकडे उतरले असता एक तरुण पाण्यात बुडून मरण पावला. तर एका तरुणाला वाचविण्यात यश आले. अहिल्यानगर येथील बालिकाश्रम रोड परिसरातील रहिवाशी असलेले मयूर लाला कांबळे, नैतिक सोनटक्के, रोहित कांबळे, विनय खिस्ती, आकाश प्रभूने असे पाच मित्र दि. ८ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजे दरम्यान राहुरी येथील मुळा धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. दरम्यान मयूर कांबळे व नैतिक सोनटक्के हे दोघे चमेली गेस्ट हाऊसच्या पाठीमागील बाजूस पीर बाबा दर्गा जवळ धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. दोघांना व्यवस्थित पोहता येत नसल्याने दोघेजण खोल पाण्यात बुडू लागले. त्यावेळी त्यांनी आरडा ओरडा केला. त्यावेळी अशोक केशव गायकवाड, किशोर चंद्रभान बर्डे, आमीन शिराज शेख, उमेश रमेश गंगे, रमेश अर्जुन निकम, संतोष एकनाथ गायकवाड, चांदभाई शेख, सरपंच अंकुश बर्डे आदि तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने पाण्यात उड्या मारून दोन्ही तरणांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत मयूर हा तरुण पाण्यात बुडून मयत झाला तर नैतिक सोनटक्के याला वाचविण्यात यश आले. मयत मयूर कांबळे याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिण असा परिवार आहे. मयूर याच्या नातेवाईकांनी घटनेची माहिती मिळताच राहुरी येथे आले. मयुरला मृत अवस्थेत पाहून नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कृषी संकल्प उत्तम; पण ‘कायाकल्प किती होणार’? : डॉ. मुळीक 
विचारांचा दुष्काळ दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरीची रचना : हभप म्हस्के
महिलांसह नागरिकांच्या तात्काळ सुरक्षेसाठी रक्षक दल; संगमनेर नगरपरिषदेचा निर्णय ; महाराष्ट्रात प्रथमच रक्षकदल कार्यान्वित

देवळाली प्रवरा : अहिल्यानगर येथील पाच तरुण सुट्टी असल्याने रविवारी (दि. ८) दुपारच्या दरम्यान मुळा धरण येथे फिरण्यासाठी आले होते. पाणी पाहुन त्यांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही. ते खोल पाण्याकडे उतरले असता एक तरुण पाण्यात बुडून मरण पावला. तर एका तरुणाला वाचविण्यात यश आले.

अहिल्यानगर येथील बालिकाश्रम रोड परिसरातील रहिवाशी असलेले मयूर लाला कांबळे, नैतिक सोनटक्के, रोहित कांबळे, विनय खिस्ती, आकाश प्रभूने असे पाच मित्र दि. ८ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजे दरम्यान राहुरी येथील मुळा धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. दरम्यान मयूर कांबळे व नैतिक सोनटक्के हे दोघे चमेली गेस्ट हाऊसच्या पाठीमागील बाजूस पीर बाबा दर्गा जवळ धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. दोघांना व्यवस्थित पोहता येत नसल्याने दोघेजण खोल पाण्यात बुडू लागले. त्यावेळी त्यांनी आरडा ओरडा केला. त्यावेळी अशोक केशव गायकवाड, किशोर चंद्रभान बर्डे, आमीन शिराज शेख, उमेश रमेश गंगे, रमेश अर्जुन निकम, संतोष एकनाथ गायकवाड, चांदभाई शेख, सरपंच अंकुश बर्डे आदि तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने पाण्यात उड्या मारून दोन्ही तरणांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत मयूर हा तरुण पाण्यात बुडून मयत झाला तर नैतिक सोनटक्के याला वाचविण्यात यश आले.

मयत मयूर कांबळे याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिण असा परिवार आहे. मयूर याच्या नातेवाईकांनी घटनेची माहिती मिळताच राहुरी येथे आले. मयुरला मृत अवस्थेत पाहून नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS