Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केडगावमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर प्रतिनिधी - राहात्या घरात गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. केडगाव परिसरातील भूषणनगर भागात ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलि

सावेडीतील युवकाची घरात गळफास घेऊन आत्महत्या
अभियांत्रिकीच्या विद्यार्थिंनीची आत्महत्या
संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या

अहमदनगर प्रतिनिधी – राहात्या घरात गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. केडगाव परिसरातील भूषणनगर भागात ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.
शिरीष शांतवन विधाते (वय 34, रा. भूषणनगर, केडगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. शिरीष शांतवन विधाते याने त्याच्या राहत्या घरात गळफास घेतल्याने त्यास दीपक चंद्रकांत विधाते याने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. शिरीष विधाते याने कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे मात्र समजू शकले नाही. यासंदर्भात अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहेत. विधाते परिवाराकडून आवश्यक माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहे. मात्र, या घटनेने केडगाव-भूषणनगर परिसरात खळबळ उडाली असून, हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS