Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, कळणार नाही

उपमुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

मुंबई/प्रतिनिधी ः शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये सध्या व्हॉटसअ‍ॅप चॅटवरून शाब्दिक युद्ध रंगल्याच चित्र दिसत आहे. यावरूनच आता उपमुख्यमंत्री देवेंद

अतिवृष्टीग्रस्तांच्या भरपाई रकमेत दुपटीने वाढ
मुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न करुया – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन 
पहाटेचा शपथविधी हा पवारांचा डबलगेम

मुंबई/प्रतिनिधी ः शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये सध्या व्हॉटसअ‍ॅप चॅटवरून शाब्दिक युद्ध रंगल्याच चित्र दिसत आहे. यावरूनच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत म्हटले आहे की, ’’मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्‍चर्य वाटते, आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ (नड्डे म्हणजे घसा) केव्हा सैल होतील, हे समजणारदेखील नाही असा इशाराच फडणवीस यांनी ट्विट करून दिला आहे.
फडणवीस म्हणाले की, ’’मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे..उद्धव ठाकरे.’’ ते म्हणाले, ’’ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत. कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्‍चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.’’ फडणवीस पुढे म्हणाले, ’’चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा. सामान्य शिवसैनिकांना वार्यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले, मुंबईला कुणी लुटले, मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले, मराठी माणसाला कुणी ओरबाडले, 00 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर.’’ ते म्हणाले, ’’तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार.’ आपल्या ट्विटच्या शेवटी फडणवीस म्हणाले की, ’’आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ (नड्डे म्हणजे घसा) केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या. बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते.’’ बघू असा इशाराच फडणवीसांना दिला आहे, त्यामुळे फडणवीस विरुद्ध ठाकरे असा संघर्ष आगामी काळात रंगण्याची शक्यता आहे

COMMENTS