नाशिक - धान्य वितरण अधिकारी कार्यालय नाशिकच्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना पिवळ्या शिधापत्रिकांचे शासन निर्धारित दराने वाटप करण्यात आले

नाशिक – धान्य वितरण अधिकारी कार्यालय नाशिकच्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना पिवळ्या शिधापत्रिकांचे शासन निर्धारित दराने वाटप करण्यात आले आहे. नागरिकांनी शिधापत्रिकेसाठी https://mahafood.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवहन नाशिकचे धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
शासनाने ठरवून दिलेले विहित नमुन्यातील अर्ज व ई-शिधापत्रिका अर्ज या वेबसाईटवर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज करतांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकरले जात नाही त्यामुळे नागरिकांनी कोणतेही दलाल अथवा एजंट यांच्याशी व्यवहार करू नये. ज्या नागरिकांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नसेल त्यांनी महा-ईसेवा सेतू केंद्र, आपले सरकार सेवा सेतू केंद्र यांच्या मार्फत ऑफलाईन अर्ज सादर करावा त्यासाठी शासनाने ठरविलेल्या दराप्रमाणेच फी भरून पावती प्राप्त करून घ्यावी, असेही धान्य वितरण अधिकारी श्री. जाधव यांनी कळविले आहे.
COMMENTS