Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मायणीच्या यशवंत विकास सोसासटीत गुदगे गटाकडून येळगावकर गटाचा धुरळा

मायणी / वार्ताहर : येथील यशवंत विकास सोसायटीच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सुरेंद्र गुदगे यांच्या समर्थकांनी सर्व 13 जागा जिंकत विरोधी डॉ. दिलीप ये

शहीद जवान रोमित चव्हाण यांना अखेरचा निरोप
पावसाळ्यात अतिवृष्टीने निर्माण होणार्‍या पुरग्रस्त भागाची पहाणी
संप मागे घेण्याचे न्यायालयाचे आदेश

मायणी / वार्ताहर : येथील यशवंत विकास सोसायटीच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सुरेंद्र गुदगे यांच्या समर्थकांनी सर्व 13 जागा जिंकत विरोधी डॉ. दिलीप येळगावकर गटाचा धुरळा उडवला. येथील यशवंत विकास सेवा सोसायटीची निवडणूक 60 वर्षानंतर झाली.
पूर्वाश्रमीचे गुदगे गटाचेच काही नाराज कार्यकर्ते येळगावकर गटाला मिळाले. सातत्याने बिनविरोध होणार्‍या सोसायटीच्या निवडणुकीला ब्रेक लागला. अनेक वर्षांतून पहिल्यांदा निवडणूक होत असल्याने विरोधकांनी कंबर कसली होती. या निवडणुकीत डॉ. दिलीप येळगांवर गटाचा धुरळा उडवत सुरेंद्र गुदगे गटाने 13 पैकी 13 जागा जिंकल्या. एकूण 1,810 मतदारांपैकी 853 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदारसंघ, विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते : सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघ : अमोल शंकर चव्हाण (508), सुनील बाबूराव माने (580), अनिल सुदाम माळी (610), लक्ष्मण बाबूराव जाधव (222), दादासो विठोबा माळी (571), चंद्रकांत ज्ञानदेव यलमर (586), गणपत हणमंत देशमुख (496), चंद्रकांत आप्पासो शिंदे (579), नाथबाबा मलू सानप (566). महिला राखीव : उषा युवराज चव्हाण (594), सुवर्णा शिवाजी साळुंखे (571). इतर मागास मतदारसंघ : सादिक आबू नदाफ (584). अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघ : सुभाष तुकाराम भिसे (575). दरम्यान, विजय घोषित होताच गुदगे समर्थक कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करत गुलालाची उधळण केली.
कार्यकर्त्यांनी सुरेंद्र गुदगे यांना खांद्यावर घेऊन जल्लोष केला. दरम्यान, आजच दिवंगत माजी आमदार भाऊसाहेब गुदगे यांची जयंती असल्याने त्यांच्या विचारांची सोसायटी गुदगे गटाकडे अबाधित ठेवण्यात गुदगे यांना यश आल्याने भाऊसाहेबांचे आशीर्वाद मिळाल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

COMMENTS