Homeताज्या बातम्यादेश

येदियुरप्पा यांची राजकारणातून निवृत्ती

बंगळुरू/वृत्तसंस्था ः कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येदियुरप्पा यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. विधानसभेत ते भाषण

मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले; उध्दव ठाकरे यांचा आरोप
दिल्ली – बंगळूरू इंडिगो विमानात मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा
शेख गालेब ने वाचविले बिबट्याचे प्राण !

बंगळुरू/वृत्तसंस्था ः कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येदियुरप्पा यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. विधानसभेत ते भाषण करताना म्हणाले की, हे माझे निरोपाचे भाषण आहे. हा एक दुर्मिळ क्षण आहे. कारण आता मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पंतप्रधान मोदींचे आभारही मानले. पुढे बोलताना ते म्हणाले की, देवाने जर मला शक्ती दिल्यास मी 5 वर्षांनंतर होणार्‍या पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेत आणण्यासाठी मी सर्वोतेपरी प्रयत्न करेन, असे ते म्हणाले.

मी आधीच सांगितले आहे की, आता मी निवडणूक लढवणार नाही, पण पंतप्रधान मोदी आणि पक्षाने मला दिलेला सन्मान आणि पद मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. सभागृहात भाषण करताना ते म्हणाले की, विरोधक म्हणतात की, मला मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आले. हे चुकीचे आहे. येदियुरप्पा यांना कोणीही मुख्यमंत्रीपदावरून हटवले नव्हते. मी वयोमानानुसार बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता. खरं तर, जुलै 2021 मध्ये येदियुरप्पा यांनी पक्षाच्या हायकमांडच्या आदेशानुसार मुख्यमंत्रीपद सोडले. त्यांच्या जागी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. येदियुरप्पा यांच्या पक्षाच्या भूमिकेवर विरोधकांनी अनेकदा प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. कर्नाटक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 24 फेब्रुवारी रोजी भाषण करण्याची विनंती सभापती आणि आमदारांनी त्यांना केली. विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनी त्यांना पुन्हा विधानसभा निवडणूक लढवण्यास सांगितले. यावर येदियुरप्पा म्हणाले की, निवडणूक न लढवण्याचा अर्थ असा नाही की मी घरी बसणार. विधानसभा निवडणुकीनंतर ते राज्याचा दौरा करून पक्ष आणि अन्य उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. पक्ष मोठा आणि मजबूत करण्यासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत काम करित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभागृहात त्यांच्या बाजूने बसलेल्या आमदारांकडे हात करत येदियुरप्पा म्हणाले की, तुम्ही आत्मविश्‍वासाने काम करा आणि निवडणुकीची तयारी करा. काळजी करू नका, विशेष बाब म्हणजे विरोधकांत बसलेल्या अनेकांना आपल्यात यायचे आहे. त्यामुळे तुमचा विश्‍वास राहिला तर आम्ही त्यांना देखील सोबत घेवू आणि भाजपला पूर्ण बहुमत देऊन सत्तेत आणू. काही गोष्टी बोलून येदियुरप्पांना गप्प बसवले जाईल, असे कोणाला वाटत असेल तर तसे मुळीच होणार नाही. मी भाजपच्या सर्व आमदारांना सांगू इच्छितो की, येत्या निवडणुकीतही आपलीच सत्ता येईल. आपल्याला पूर्ण बहुमत मिळणार आहे, ही गोष्ट चंद्र-सूर्याइतकीच सत्य आहे. काँग्रेसला विरोधी पक्षातच बसावे लागणार हेही अगदी अंतिम सत्य आहे. याबद्दल तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका आणि मी काही भाकीत केले आहे, असे मुळीच समजू नका.

COMMENTS