Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्रीय क्रीडा महोत्सव उत्साहात

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्रीय क्रीडा महोत्सव – २०२५ चे सर्वसाधारण विजेतेपद पुणे विभागाने पटकावले. विद्यापीठाचे मा.

जालना शहरालगतच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाची सखोल चौकशी करणार :  मंत्री बावनकुळे
एकत्रित आयुष्मान भारत–महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील उपचारांची संख्या २,३९९
सभापती प्रा राम शिंदे यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात महाआरती 
Displaying क्रीडा समारोप १.jpeg

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्रीय क्रीडा महोत्सव – २०२५ चे सर्वसाधारण विजेतेपद पुणे विभागाने पटकावले. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे व प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली येथील के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या पटांगणावर हा दोन दिवशीय केंद्रीय क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या केंद्रीय क्रीडा महोत्सवात विद्यापीठाच्या अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर व नांदेड या आठ विभागीय केंद्रातील एकूण ४०५ खेळाडू विद्यार्थी सहभागी झालेले होते. त्यात कबड्डी, खो – खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, बुद्धीबळ. अँथलेटिक्स, बॅडमिंटनसह एकूण १८ विविध  प्रकारच्या खेळांच्या चुरशीच्या स्पर्धा रंगल्या. यातून निवडलेले जवळपास १५० खेळाडू विद्यार्थी हे येत्या दिनांक ०४ ते ०८ डिसेंबर २०२५ दरम्यान नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या ‘अश्वमेध’ या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील.  दरम्यान निवड झालेया सर्व खेळाडूंना नाशिक येथील विद्यापीठ मुख्यालयात अव्वल दर्जाच्या तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात येणार आहे.   

  समारोप कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाच्या नागपूर विभागीय केंद्राचे संचालक तथा माजी राष्ट्रीय खेळाडू डॉ. धनंजय वेळूकर होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य म्हणून प्रा. डॉ. संजीवनी महाले व डॉ. डी. एम. गुजराथी, विद्यापीठाच्या विद्यार्थी व बहि:शाल केंद्राचे प्रमुख डॉ. दयाराम पवार, विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नितीन ठोके, के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या क्रीडा संचालक डॉ. मीनाक्षी गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.

समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलतांना डॉ. धनंजय वेळूकर म्हणाले की खेळाची मैदाने ही व्यक्तिमत्व विकासाच्या प्रयोगशाळा असतात. कुठल्याही क्षेत्रातील नेतृत्व हे खेळातून अधिक चांगल्या प्रकारे विकसित होते. योग्य वयात खेळाचा व कौशल्यांचा आपल्या जीवनातील प्रगतीसाठी उपयोग करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षपदावरून बोलतांना विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी खेळातून संघभावना व सामुहिक विकास होत असल्याचे सांगितले. विद्यापीठाचा गेल्या क्रीडा महोत्सवातील व अश्वमेध स्पर्धेतील रौप्यपदक विजेता खेळाडू अली तांबोळी यास प्रमुख अतिथी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यश देशमुख (अमरावती) व कु. जान्हवी अतकरी (नागपूर) या विद्यार्थी खेळाडूंनी प्रातिनिधिक स्वरूपात क्रीडास्पर्धा आयोजनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रमुख अतिथी यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या खेळाडू विद्यार्थ्यांना पदक, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरवण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून डॉ. मीनाक्षी गवळी यांच्यासह श्री. अनिकेत इंगोले, श्री. हृषीकेश करकाळे, डॉ. सुनील धोंडगे, प्रा. नामदेव काकड, डॉ. ज्ञानेश्वर गडाख, प्रा. विजय ढिकले, प्रा. हेमंत काळे, प्रा. मेघाराणी पवार, प्रा. पूर्वा ढोके, प्रा. चेतना शर्मा, श्री. स्वप्नील पवार, श्री. ओम मोरे, प्रा. दिपाली खोडदे, प्रा. अविनाश कदम, प्रा. राजाराम पोटे, प्रा. बाळू शिंदे, श्री. शुभांग मराळे, श्री. आरती वाघ, श्री. विनायक वाडीले, श्री. राहुल आव्हाड, श्री. केदार कडाळे, प्रा. पी. के. खैरनार, श्री. विकी वळवी, श्री. हर्षाली अंडांगळे, प्रा. योगेंद्र पाटील, डॉ. हेमा मांडे, श्री. शरद पाटील, मयुरी आल्हाड यांनी काम पाहिले.

समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माधुरी खर्जुल यांनी केले. प्रास्ताविक विद्यापीठाच्या विद्यार्थी व बहि:शाल केंद्राचे प्रमुख डॉ. दयाराम पवार यांनी केले. विजेत्यांच्या नावाची उद्घोषणा व आभारप्रदर्शन श्री. सचिन शिंदे यांनी केले. स्पर्धेतील विविध खेळ व त्यातील स्त्री – पुरुष गटातील प्रथम क्रमांकाचे विजेते पुढीलप्रमाणे – बुध्दिबळ – अथर्व बोचरे (अमरावती) व नंदिनी बागुल (नाशिक), टेबल टेनिस – रितेश ठाकरे (नाशिक) व स्नेहल व्यवहारे (नांदेड), ५००० मीटर धावणे – ठाकरे खुमानसिंग (नाशिक) व अश्विनी इंगळे (अमरावती), १५०० मीटर धावणे – अभिजित पगारे (कोल्हापूर) व अदिती मेतकर (अमरावती), ८०० मी. धावणे अभिजित पगारे (कोल्हापूर) व माया भोसले (नांदेड), ४०० मीटर धावणे – साहिल दुधकर (नागपूर) व गौरी गुरव (कोल्हापूर), २०० मीटर धावणे – प्रथमेश थोरवे (पुणे) व वैष्णवी पानसरे (नाशिक), १०० मीटर (मुले) – सार्थक चव्हाण (पुणे) व जान्हवी चोले (नागपूर), थाळीफेक – विश्वजित नलावडे (पुणे) व खुशाली मेश्राम (अमरावती), गोळाफेक – शंतनू मांडरूपे व ऋतुजा बनकर (पुणे), भालाफेक – महेश जाधव (पुणे) व अक्षता फुटाणे (नांदेड), उंचउडी – प्रतिक नन्हे व खुशाली मेश्राम (अमरावती), लांबउडी – चिघळे ग्रीकांत (पुणे) व जान्हवी चोले (नागपूर), तिहेरी उडी (मुले) – तांबोळी अली सबीर (पुणे), रिले (मुले) ४×१०० –  अजिंक्य हजारे, रियाज तांबोळी, सार्थक चव्हाण, थोरवे प्रथमेश (पुणे), रिले (मुली) ४×१०० – खुशाली मेश्राम, नेहा चव्हाण, अश्विनी इंगळे, पायाल मुंजे (अमरावती), रिले (मुले) ४×४०० –  भैय्या ठाकूर, रोहित किणी, पंकज हाते, हर्शल पिठोळे (मुंबई), बॅडमिंटन – चंदनशिव यसराज व अस्मिता खडक्कर (छत्रपती संभाजी नगर), खो-खो (मुले) – पुणे विभाग खो-खो (मुली) – अमरावती कबड्डी (मुले) – पुणे, व्हॉलीबॉल (मुले) – पुणे.  

सदर केंद्रीय क्रीडा महोत्सव यशस्वी होण्यासाठी क्रीडा समन्वयक सिद्धांत टाक, क्रीडा महोत्सवाच्या विविध समितीमधील सदस्य सुनील निकम, भावना भऊरकर, कविता देव, मंगेश पवार, राजेश बर्वे, केशव चौधरी, बांधकाम विभाग, दृक्श्राव्य विभाग, आरोग्य विभागाचे अधिकारी व विविध समित्यांमधील सदस्य कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

COMMENTS