अमरावती :जनतेला चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता तिवसा तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवारी तिवसा विधानसभा मतदार संघाच्या आमदा
अमरावती :जनतेला चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता तिवसा तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवारी तिवसा विधानसभा मतदार संघाच्या आमदार तथा माजी मंत्री (महिला व बाल विकास) ॲड. यशोमती ठाकूर यांच्याहस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत तिवसा तालुक्यातील तिवसा, वरुडा, सुरवाडी, मिर्चापूर, निंबोरा देलवाडी आणि अमदाबाद आदी ठिकाणी या कामांना प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आल्याचे ॲड. ठाकूर यांनी स्पष्ट केले. तिवसा उपजिल्हा रुग्णालय इमारतीची दुरुस्ती, तसेच येथील सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे बांधकाम आदी विकासकामांचे भूमिपूजन आज केले. या विकासकामांसाठी जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ अंतर्गत अनुक्रमे रुपये २९.५० लक्ष आणि रुपये १४.५० लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आला. दरम्यान तिवसा उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करून ॲड. ठाकूर यांनी येथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यासोबतच वरुडा गावातील ग्रामपंचायत जागेवर सभा मंडपाच्या बांधकामाचे भूमीपूजन ॲड. ठाकूर यांनी केले. याकरिता स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत रुपये १० लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी सार्वजनिक बांधम विभागाचे सर्व अधिकारी कंत्राकदार प्रामुख्याने उपस्थित होते त्याचवेळी यशोमती ताईंनी या अधिकाऱ्यांना सज्जड दम भरल्याचा एक व्हिडिओ सध्या व्ययरल होत आहे त्या व्हिडीओ मध्ये काम चांगले केले नाही तर डोके फोडेन असा दम भरतांना यशोमतीताई ठाकूर दिसत आहे मी तुमच्या कडून एक रुपयाही कमीशन घेत नाही त्यामुळे इथं कॉलिटीचे काम झालेले दिसले पाहिजे असा इशारा यशोमतीताई ठाकूर यांनी दिला.
COMMENTS