Homeताज्या बातम्यादेश

यशस्वी जैस्वालची टीम इंडियात एंट्री

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन सामन्याच्या कसोटी मालिकेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. डोमिनिकाच्या विंडसर पार्कमध्ये भारत आणि विंडिजचे

योग विद्येत प्रिया चव्हाण राज्यात चौथी; सातारा जिल्ह्यात द्वितीय
सातारा जिल्हा वार्षिक योजनेसाठी 400 कोटी रुपयांचा निधी : उपमुख्यमंत्री
नेमबाजीत साईराज काटेला दोन पदके

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन सामन्याच्या कसोटी मालिकेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. डोमिनिकाच्या विंडसर पार्कमध्ये भारत आणि विंडिजचे खेळाडू भिडणार आहेत. या सामन्यात यशस्वी जायस्वाल पदार्पण करणार आहे. रोहित शर्मा याने याबाबातची माहिती दिल्याचे वृत्त आहे. विडिंज दौऱ्यात चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आले होते. भारतीय संघात काही युवा खेळाडूंना स्थान देण्यात आलेय. बुधवारी यशस्वी जायस्वाल पदार्पण करणार आहे.  वेस्ट इंडिजविरोधात भारतीय संघ सलामीला नवीन जोडी मैदानात उतरवणार आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल सलामीला खेळणार आहेत. त्यामुळे शुभमन गिल याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरावे लागणार आहे. रोहित शर्माने यशस्वी जायस्वाल पदार्पण करणार असल्याचे सांगितले. त्याशिवाय शुभमन गिल तिसऱ्या तर यशस्वी सलामीला खेळणार असल्याचेही सांगितले.  भारतीय संघात दोन फिरकी गोलंदाज खेळणार असल्याचेही रोहित शर्माने सांगितेल. रविंद्र जाडेजा आणि आर. अश्विन प्लेईंग 11 मध्ये खेळणार आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आर. अश्विन याला संघाबाहेर ठेवले होते. त्यामुळे रोहित शर्मा आणि बीसीसीआयवर टीका झाली होती. भारतीय संघ आता दोन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरणार आहे. 

COMMENTS