नगर-मनमाड रस्त्यावर प्रकटले यमराज व चित्रगुप्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर-मनमाड रस्त्यावर प्रकटले यमराज व चित्रगुप्त

रस्त्यासाठी कोपरगाव मनसेच्या वतीने अनोखे आंदोलन

कोपरगाव/शहर प्रतिनिधी : नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या खड्डयामुळे अनेक वेळेस अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. अनेक आंदोलने करूनही रस्त्यांची दखल ना

Crime Alert : पत्नीचा खून करून पती झाला फरार…
खुनाच्या प्रयत्नाबद्दल एकास सक्तमजुरीची शिक्षा
पत्रकार बाळ बोठेचा शोध घेणे ठरले आव्हानात्मक…

कोपरगाव/शहर प्रतिनिधी : नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या खड्डयामुळे अनेक वेळेस अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. अनेक आंदोलने करूनही रस्त्यांची दखल ना प्रशासनाने घेतली, ना सरकारने. त्यामुळे आपण लोकशाहीतच राहतो ना, असा सवाल नागरिक उपस्थित करत असतांनाच, गुरुवारी कोपरगाव मनसेच्या वतीने नगर-मनमाड रस्त्यावर यमराज व चित्रगुप्त आल्याचे दर्शवत अनोखे आंदोलन करून, नागरिकांचे आणि सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मनसैनिकांनी केला.
या रस्त्यावर पडलेल्या गुडघ्या एवढ्या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे अपघात देखील झाले आहे या अपघातात अनेकांनी आपले हात,पाय गमविले आहे तर अनेकांनी आपला जीव देखील गमवला असून यातून अनेकांची कुटूंब उद्धवस्त झाली आहे. अनेक संघटनानी गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे आंदोलन करत राजकारण्यांना व प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न करत या रस्त्याची दुरुस्ती ची मागणी केली परंतु या रस्त्या कडे ना राजकारण्यांनी ना अधिकार्‍यांनी लक्ष दिले. प्रशासन व अधिकारी हे जाणूनबुजून झोपेचे नाटक करताय की मेले हेचं समजत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोपरगाव शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे यांच्या नेतृत्वाखाली जिवंत यमराज व चित्रगुप्त दाखवुन अनोखे आंदोलन करत हा प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. या आंदोलनात खड्ड्यांमुळे एका निष्पाप व्यक्तीचा अपघात होऊन तो मृत्युमुखी पडतो व त्याचा प्राण घेण्यासाठी प्रत्यक्षात यमराज व चित्रगुप्त येतात व त्याचा प्राण घेऊन जातात व त्याच बरोबर प्रशासन अधिकारी झोपेचे नाटक करत असेल तर त्यांना जागवुन जाऊ आणि कदाचित मेले असतील तर त्यांचे देखील प्राण घेऊन जाऊ असे यमराज व चित्रगुप्त यांच्या मनात येते असा प्रसंग या प्रसंगी मनसेने आपल्या आंदोलनातुन दाखवत या सर्व प्रसंगाला प्रशासनाचे जबाबदार असते परंतु निष्पाप लोकांना आपला जिव गमवावा लागतो हिचं शोकांतिका मांडण्याचा प्रयत्न केला. या अनोख्या आंदोलनात यमराजच्या भुमिकेत हिंदु सम्राट संघटना संस्थापक अध्यक्ष बापुभाऊ काकडे तर चित्रगुप्त च्या भुमिकेत मनसे उपशहराध्यक्ष अनिल गावडे हे होते. यावेळी विद्यार्थी उपशहराध्यक्ष संजय जाधव, अनिल सुपेकर मनसे युवा नेते नवनाथ मोहिते, राजु जाधव, विक्रम काकडे, अजिंक्य काकडे, सुरेश सुपेकर,रोशन पवार, सचिन गरकल, सुनिल कवले, रमेश वाघ, भैय्या सुपेकर, बंटी पवार, भैय्या यदमळ, कुंदन गाडे, आभी पवार, दीपक सुपेकर, अनिल शाख, सचिन पवार आदि मनसैनिक उपस्थित होते.

सरकार व प्रशासन जागे होईल का ?
या रस्त्यावर पडलेल्या गुडघ्या एवढ्या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे अपघात देखील झाले आहेत. या अपघातात अनेकांनी आपले हात,पाय गमविले आहे तर अनेकांनी आपला जीव देखील गमवला असून यातून अनेकांची कुटूंब उद्धवस्त झाली आहे. अनेक संघटनानी गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे आंदोलन करत राजकारण्यांना व प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न करत या रस्त्याची दुरुस्ती ची मागणी केली परंतु या रस्त्याकडे ना राजकारण्यांनी ना अधिकार्‍यांनी लक्ष दिले. प्रशासन व सरकार हे जाणूनबुजून झोपेचे नाटक करताय की काय, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोपरगाव शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे यांनी केला आहे.

COMMENTS