Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जायनावाडीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात

अकोले ः अकोले तालुक्यातील जायनावाडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाकालेश्‍वर प्रतिष्ठानचे सर्व तरुण वर्ग व ग्राम

ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय स्वागतार्ह ः आ. आशुतोष काळे
प्रवराच्या कृषी महाविद्यालाचा जर्मनीतील कंपन्यांशी सामंजस्य करार
मस्जिदीत नमाज पठणावर रमजान काळात बंदी

अकोले ः अकोले तालुक्यातील जायनावाडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाकालेश्‍वर प्रतिष्ठानचे सर्व तरुण वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी काळू भांगरे यांनी बोलताना जागतिक आदिवासी दिन हा सन आफ्रिका खंड अमेरिका या देशांमध्ये हा सण साजरा होत होता. एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन हा सण साजरा केला पाहिजे असे जागतिक आदिवासी दिनानिमित्त तुम्हाला काय सांगायचं आहे आमची संस्कृती काय, आमचा पोशाख, आमचा अभिमान काय, हे आपण अभ्यासले पाहिजे.
ावेळी सागर डगळे यांनी आपण जागतिक आदिवासी दिन सण हा एकत्र येऊन उत्साह संपन्न करत असतो, पण काही ठिकाणी कुठेतरी वेगळ्या पद्धतीचा सण साजरा होत असल्याची खंत व्यक्त केली. अमोल भांगरे यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
   यावेळी माजी सरपंच हिरामण भांगरे, काळू भांगरे, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव भांगरे, सागर डगळे, महाकालेश्‍वर प्रतिष्ठानचे अमोल भांगरे, राहुल भांगरे, अशोक भांगरे, श्याम भांगरे, गोरख भांगरे, तुकाराम भांगरे, काळू भांगरे, मधुकर भांगरे, ज्ञानेश्‍वर सूर्यवंशी, रोहन भांगरे, अतुल भांगरे, अनिल भांगरे, काळू भांगरे, संतोष भांगरे यांसह महिला, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

COMMENTS