Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये जागतिक ग्राहक दिन उत्साहात

संगमनेर/प्रतिनिधी ः संगमनेर तहसिल कार्यालय येथे बुधवारी जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य संगमनेर तालुका अध्यक्

प्रा. दिलीप सोनवणे यांची’ देवमाणसं’ वाचून वाचकांनी आपल्या जीवनातील देवमाणसं चित्रित करावी ः डॉ. अशोकराव सोनवणे
प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे : सभापती शरद कार्ले
मन, आचरण शुध्द तरच कामही शुध्द : अजिनाथ हजारे

संगमनेर/प्रतिनिधी ः संगमनेर तहसिल कार्यालय येथे बुधवारी जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य संगमनेर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्‍वर राक्षे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, किशोर कदम सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर यांचे प्रमुख उपस्थितीत समारंभ पार पडला.
याप्रसंगी तहसीलदार अमोल निकम, परिविक्षाधीन तहसीलदार शीतल घावटे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव सुरेश राहणे, दिनेश थोरात, संगमनेर तालुका अध्यक्ष विनायक वाडेकर, सर्जेराव वाघ, सचिन गिरी, सौरभ म्हाळस ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य संगमनेर तालुका सचिव, कारभारी देव्हारे, कायदेशीर सल्लागार गोडसे, तसेच वजनमापे निरीक्षक फटांगरे, व संगमनेर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार आणि मोठ्या संख्येने ग्राहक व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून व मान्यवरांचा सत्कार करून करण्यात आली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल निकम तहसीलदार संगमनेर यांनी केले. जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी उपस्थिताना ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात ज्ञानेश्‍वर राक्षे यांनी ग्राहकांनी त्यांच्या हक्काबाबत जागरूक रहाणेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित ग्राहकांनी गॅस एजन्सी, महावितरण, गावपातळीवर ग्रामपंचायत मध्ये नागरिकांची सनद असणे आवश्यक आहे तसेच मॉल, मिठाई केंद्र, फळविक्रेते आदी. बाबत आपल्या वेगवेगळ्या तक्रारी मांडल्या त्यावर उपस्थित अधिकार्‍यांनी नागरिकांच्या शंकाचे निरसन केले व चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महसूल नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी केले. आभार प्रदर्शन निवासी नायब तहसीलदार श्री गणेश तळेकर यांनी केले.

COMMENTS