Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरजेएस नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक क्षय दिन उत्साहात

कोपरगाव ः जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च रोजी म्हणून जगभर साजरा केला जातो. कारण 24 मार्च 1882 साली वैज्ञानिक रोबार्ट कोच यांनी क्षयरोगाचा विषाणू शोध

देसवंडीच्या उपसरपंचपदी निकिता शिरसाट
कांद्यावरील 40 टक्के निर्यात करविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
कोपरगांव मुर्शतपुर शिवारात प्रथमच नागवेली पान लागवडीचा प्रयोग

कोपरगाव ः जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च रोजी म्हणून जगभर साजरा केला जातो. कारण 24 मार्च 1882 साली वैज्ञानिक रोबार्ट कोच यांनी क्षयरोगाचा विषाणू शोधून काढला. आणि म्हणूनच हा दिवस जागतीक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्‍वभुमीवर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी 22 मार्च रोजी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे जनजागृतीपर कार्यक्रम साजरा केला होता. विद्यार्थ्यांनी क्षयरोग म्हणजे काय, त्याचे लक्षणे व कारणे तसेच त्यावर प्रतिबंधात्मक उपाय याविषयांवर रूग्णांना तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान कोपरगाव तालुक्याचे आरोग्य अधिकारी विकास घोलप कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौंदर  तसेच क्षयरोग विभागाचे प्रमूख डॉ.मगरे तसेच रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांनीही उपस्थिती नोंदवली.कोपरगाव तालुक्याचे आरोग्य अधिकारी विकास घोलप यांनी आपले मनोगत मांडले व क्षयरोगाविषयक जनजागृती केली. क्षयरोग टाळण्यासाठी काय – उपाय योजना कराव्यात याचीही त्यांनी माहिती रूग्ण व नातलगांना दिली. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.कार्यक्रम पार पाडण्यासाठी रुग्णालयातील सर्व कर्मचारी  तसेच कॉलेजच्या शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी रूग्ण व नातेवाईकाना थंड पेय वाटप करून कार्यक्रमाची सांगता केली.

COMMENTS