अकोले ः जागतिक आदिवासी दिन कल्याण डोंबिवली महानगर पालिका आदिवासी कल्याणकारी सेवा संस्था व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली मुंबई विभाग
अकोले ः जागतिक आदिवासी दिन कल्याण डोंबिवली महानगर पालिका आदिवासी कल्याणकारी सेवा संस्था व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली मुंबई विभाग आणि आदिवासी उत्सव समिती, बहुजन परिवर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य अत्रे नाट्य ग्रहामध्ये संपन्न झाला. सदर प्रसंगी आयुक्त. डॉ. इंदुरणी जाखड, आतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, रामनाथ भोजने (अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली मुंबई-कोकण अध्यक्ष), प्रभुदास पंधरे (उत्सव समिती अध्यक्ष कल्याण) यांच्या शुभहस्ते आदिवासी क्रांतिकारकांच्या व महामानवाच्या प्रतिमेला पुष्प मला अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.
आदिवासी बांधवांना डॉ. इंदुमती राणी जाखड (कल्याण आयुक्त) यांनी आपल्या भाषणात आदिवासी हे मूळ निवासी असून त्यांच्या कला, संस्कृती, परंपरा, अशा समाजा पर्यंत पोचल्या पाहिजे म्हणून अांतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक आदिवासी दिनाची घोषणा झाली म्हणून कल्याण डोंबिवली महानगर पालिका येथे आदिवासी समाजाच्या मागणी नुसार आदिवासी सांस्कृतिक भवन व्हावे ही मागणी नगरपालिकेने व शासनाने पूर्ण करावे त्या साठी विशेष सहकार्य नगरपालिकेच्या वतीने करण्यात येईल असे आयुक्त यांनी सांगितले. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने रामनाथ भोजने यांनी भाषणात कल्याण येथे क्रांतिवीर राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, राणी दुर्गावती यांचे चौक निर्माण झाले असून या धरतीवर आदिवासी सांस्कृतिक भवन हे क्रांतिकारकांच्या नावाने उभे राहावे असे पत्र मुखमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिले आहे असल्याचे सांगितले. भागाजी भांगरे (अध्यक्ष कल्याणकारी संघटना), सागर धामोडे( सचिव), अनिल गावितकर (कोषाध्यक्ष), भरत बुळे (उपाध्यक्ष), भरतकुमार पाटील, प्रबुदास पंधरे, मेघनाथ नवाळे, सुरेश पवार आणि सूत्र संचालन गायकवाड यांनी केले व आभार विजय सरकटे, यांनी मानले. या कार्यक्रमाचे नियोजन करून आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमासाठी मुंबई, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, कर्जत, कसारा, नवी मुंबई या उपनगरातील आदिवसी बांधव उपस्थित होते.
COMMENTS