Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नोकरी करणाऱ्या महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांच्या बोरिवली येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. या वसतिगृहात  सन २०२४-२५ वर्षाकरिता

मी अजूनही राष्ट्रवादीचाच आमदार
लातूर शहर पोलीसच देणार रिक्षाचालकांना गणवेश; राज्यातला पहिलाच उपक्रम
पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाची सुधारणा करणार ; 2 हजार 50 कोटी रुपये खर्च अपेक्षित

मुंबई : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांच्या बोरिवली येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. या वसतिगृहात  सन २०२४-२५ वर्षाकरिता प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन बोरिवली येथील शासकीय वसतीगृहाच्या व्यवस्थापक यांनी केले आहे.

या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ या प्रवर्गातील असाव्यात. तसेच अर्जदार महिलेचे मासिक उत्पन्न ३० हजारांपेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी   सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-७१ या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

COMMENTS