Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाणेरमध्ये टाकीची भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू

पुणे: नियोजित गृहप्रकल्पात पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना बाणेर-पाषाण रस्त्यावर घडली. दुर्घटनेत एक मजूर जखमी झाला

कोरोना संकटात ही राज्यासह तालुक्यात विकास कामांचा वेग कायम – नामदार थोरात
झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्त्यांची दर्जोन्नती करून हस्तांतरित करा
LIVE पुणे अनाथांची माय असणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ याचं अंतिम दर्शन

पुणे: नियोजित गृहप्रकल्पात पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना बाणेर-पाषाण रस्त्यावर घडली. दुर्घटनेत एक मजूर जखमी झाला, असून दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी ठेकेदारासह दोघांच्या विरोधात चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

रोहन रामचंद्र घाडे (वय 26 रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. दुर्घटनेत मजूर आशिष बिंद जखमी झाला आहे. रोहनचा भाऊ रोशन (वय 20) याने याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी ठेकेदार रवींद्र डंडे, गोविंद राम सोनटक्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाणेर- पाषाण लिंक रस्त्यावर माऊट क्लेअर या गृहप्रकल्पाचे काम सुरू आहेत. गृहप्रकल्पातील टाकीच्या भिंतीचे काम रोहन आणि आशिष करत होते. त्या वेळी अचानक भिंत दोघांच्या अंगावर कोसळली. दुर्घटनेत रोहन आणि आशिष जखमी झाले. रोहन आणि आशिषलला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान रोहनचा मृत्यू झाला. बांधकाम मजूर रोहन आणि आशिष यांना सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याने गंभीर दुर्घटना घडल्याचे तपासात उघडकीस आले. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी ठेकेदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक कपील भालेराव तपास करत आहेत

COMMENTS