शिर्डी : येथील अ.ए.सो.चे श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयान महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका बोहाडे होत्या. संजया उदमले सामाजिक कार्यक्रत्या यांनी महिलाचे सामाजिक स्थान व कर्तव्ये यावर आपले विचार मांडले. विधीतज्ञ वर्षा उन्हाळे यांनी थोर महिलांच्या यशोगाथा व महिलांचे सक्षमीकरण यावर मार्गदर्शन केले. तर वैदयकिय अधिकारी समृद्धी जाधव यांनी महिलांचे आरोग्य व शालेय जीवनात स्त्रियांचे कर्तृत्व यावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रुचिका गव्हाणे, अम्कृती सोनी, सोफिया पठाण यांनी भाषणे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्ना शेळके यांनी केले. पाहुण्याचा परिचय व सत्कार धनकुटे, विटणकर यांनी केला. आभार जोरी यांनी मानले. याप्रसंगी विदयालयाचे मुख्याध्यापक डूबल, पर्यवेक्षक बेलदार, पालकवर्ग व माता पालक उपस्थित होते. जयश्री अभंग, सुनीता चैनी, सुरेखा पगारे, सोहम डूबल यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

COMMENTS