Homeताज्या बातम्यादेश

दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षाच असुरक्षित

कार चालकाने सुमारे 15 मीटर नेले फरफटत

नवी दिल्ली ः दिल्लीत महिला अत्याचार व बलात्काराच्या घटना ताज्या असतानाच आता दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षाच असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. एका

आग्रा किल्ल्यात प्रथमच शिवजयंतीचा उत्सव
तीन शब्द वगळल्यानंतरच उपोषण सोेडणार
तुमचे आजचे राशीचक्र शनिवार, ११ जून २०२२ | LOKNews24

नवी दिल्ली ः दिल्लीत महिला अत्याचार व बलात्काराच्या घटना ताज्या असतानाच आता दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षाच असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. एका कारने त्यांना 10 ते 15 मीटर फरफटत नेल्याचे समोर आले आहे. कार चालकाने त्यांना कारमध्ये बसण्यास सांगितले, मात्र त्यांनी त्याला विरोध केला. दिल्ली पोलिसानुसार दारूच्या नशेत धूत कार चालकाने दिल्लीमध्ये एम्सच्या गेट नंबर दोनच्या समोरून स्वाती मालीवाल यांनी 10 ते 15 मीटर फरफटत नेले. दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
दरम्यान पोलिसांनी आरोपी कार चालकाला पहाटेच्या सुमाराला अटक केलीय. या प्रकारामुळे राजधानीतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आलाय. दिल्लीत रात्री घडलेल्या प्रकाराबद्दल महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी ट्विट करत माहिती दिली. यासंदर्भातील माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. स्वाती मालीवाल एम्सच्या गेट क्रमांक- 2 जवळ होत्या. यादरम्यान एका कार चालकाने त्यांना कारमध्ये बसण्यास सांगितले. स्वातीने कार चालकाला ख़डसावले असता त्याने तात्काळ गाडीची काच वर केली. यादरम्यान स्वातीचा हात कारमध्ये अडकला आणि चालकाने त्यांना सुमारे 15 मीटरपर्यंत फरफटत नेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीसीआरवर पहाटे 3.11 वाजता त्यांना कॉल आला की पांढर्‍या रंगाच्या बलेनो कारच्या चालकाने एका महिलेकडे चुकीचे हावभाव केले आणि तिला एम्स बस स्टॉपच्या मागे फरफटत नेले, परंतु ती महिला पळून जाण्यात यशस्वी झाली.

COMMENTS