Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा

शालीनीताई विखे पाटील यांचे आवाहन

लोणी ः चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छ पाण्याची  गरजआहे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणार्‍या कुटुंबासाठी उत्तम आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी या अंतर्गत

समृद्धीवरील अपघातात तिघांचा मृत्यू
स्वच्छता अभियान ही लोकचळवळ व्हावी : डॉ. सागर बोरुडे
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी मनेष गाडे

लोणी ः चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छ पाण्याची  गरजआहे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणार्‍या कुटुंबासाठी उत्तम आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ पाणी या अंतर्गत लाभार्थ्यांसाठी भारतीय ऊस संशोधन संस्था लखनऊ अंतर्गत जैविक नियंत्रण केंद्राचा उपक्रम हा महत्त्वपूर्ण असून महिलांसाठी महायुती सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंञी माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेसाठी सुरू आहे. या योजनेचा लाभ घेऊन महिलांनी त्यांच्यासाठी असलेल्या योजना समजून घ्याव्यात असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
      जैविक नियंत्रण केंद्र प्रवरानगर यांच्या वतीने लोहगाव,बाभळेश्‍वर,लोणी येथील भूमिहीन शेतकर्‍यांसाठी एस. सी. एस. पी. कार्यक्रमााअंतर्गत उत्तम आरोग्यासाठी स्वच्छ पाणी स्वच्छ योजनेअंतर्गत पाणी टाकी आणि विविध साहित्यांचे वितरण सौ. विखे पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अ‍ॅड. बाबासाहेब चेचरे, भाऊसाहेब चेचरे, माजी सरपंच स्मिता चेचरे, सरपंच शशिकांत पठारे,उपसरपंच दौलत चेचरे, जैविक नियंत्रण केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्‍वर बोरसे, डॉ, योगेश थोरात आदींसह लाभार्थी उपस्थित होते. यावेळी विखे पाटील म्हणाल्या आज शासनाच्या विविध योजना आहेत. त्या योजनेची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्या, महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महिलांनी लाभ घेऊन जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन विखे पाटील यांनी यावेळी केले. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्‍वर बोरसे यांनी आभार प्रदर्शन केले.

COMMENTS