Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास नव्या पिढीला समजावून सांगण्यासाठी महिलांनी पुढे यावे-जिल्हाधिकारी

अंबाजोगाई प्रतिनिधी - परिसंवाद ही महिला उत्थानाची एक चळवळ असून या महिला परिसंवादातून मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त या लढ्यात ज

तीन हजारापेक्षा अधिक ग्रामपंचायतीवर विजय
मांढरदेवीच्या मुख्य यात्रेला सुरुवात
व्हिजन रंगोत्सव अंतर्गत शहरातील बच्चे कंपनीकडून लुटला रंगाचा मनमुराद आनंद

अंबाजोगाई प्रतिनिधी – परिसंवाद ही महिला उत्थानाची एक चळवळ असून या महिला परिसंवादातून मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त या लढ्यात ज्या महिलांनी आपल्या लढ्यातून हे स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या  मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी महिलांनी पुढे यावे असे प्रतिपादन बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे यांनी केले.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य योद्ध्या श्रीमती अहिल्याबाई मल्लणा सभागृह, परिचय मंगल कार्यालय, परळी रोड (अंबाजोगाई) येथे आयोजित महिला परिषदेच्या उद्घाटन सत्रात प्रमुख मार्गदर्शिका म्हणून बोलताना जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे म्हणाल्या की, भारतीय संस्कृती मध्ये महिलांना शक्ती स्वरूप मानलेले आहे. या महिला शक्तीने जवळपास प्रत्येक स्वातंत्र्य युद्धात हिरीरीने सहभाग नोंदवून आपल्या मातृभूमीला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान ही दिले आहे. त्याला हा मराठवाडा मुक्तीसंग्राम हा लढा काही अपवाद नाही. या लढ्यात सुद्धा महिलांचे खूप मोठे योगदान आहे. या महिलांच्या कर्तृत्वाचा, त्यागाचा गौरव व सन्मान करताना त्यांच्या कार्यातून ऊर्जा घेवून आजच्या महिलांनी समाजासाठी दिशादर्शक बनावे. शालेय परिपाठात विद्यार्थ्यांवर संस्कार घडावेत म्हणून वंदे मातरम् दररोज म्हणावे असा आग्रह धरलेला आहे, आपण आपल्या पाल्यांना या विषयी विचारणा करावी व घरी सुद्धा पुर्वीप्रमाणे संस्कारांची रूजवणूक होण्याची ही वेळ आलेली आहे. व हे संस्कार देण्याची जबाबदारी गृहिणीचीच आहे. ती त्यांनी सार्थपणे पार पाडावी व संस्कारक्षम पिढी घडवावी. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे यांनी केले. तर प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्य योद्ध्या श्रीमती रूक्मीणबाई चौसाळकर चित्रावलीच्या उद्धाटनानंतर दीपप्रज्वलनाने व प्रतिमापूजनाने महिला परिषदेला प्रारंभ झाला. महिला परीषद चार सत्रात होणार आहे. यात तीन महत्त्वाच्या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आलेले आहेत. मान्यवर वक्ते मौलिक चिंतन मांडणार आहेत. प्रास्ताविकातून संयोजन समितीचे अध्यक्ष प्रविण सरदेशमुख यांनी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. व या उपक्रमांचे व कार्यक्रमाचे आयोजना मागील प्रयोजन सांगितले. यावेळी मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचा इतिहास सांगणार्या पुस्तिकेचे प्रकाशन ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ.सुरेंद्र आलुरकर यांनी म्हटले की, अंबाजोगाईच्या महिला पूर्वीपासूनच आपल्या कर्तव्या विषयी जागरूक असून या मूक्तीसंग्राम लढ्यातील त्यांच्या योगदानावरून हे सिद्धच होते. आपण नेहमी म्हणतो की, मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंबच नव्हे तर समाज शिकतो. त्यामुळे या परिसंवादाच्या माध्यमातून हा इतिहास समाजासमोर आणण्यासाठी महिलांनी परिश्रम घेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या महिला परिषदेसाठी स्वातंत्र्य योद्ध्या श्रीमती काशीबाई किर्लोस्कर व्यासपीठावर भा.शि.प्र.संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य,पं.दीनदयाळ शोध संस्थानचे डॉ.उपेंद्र कुलकर्णी, अतिरीक्त जिल्हाधिकारी सुनिल यादव, उपजिल्हाधिकरी शरद झाडके, तहसीलदार श्री.तरंगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.चंद्रकांत मुळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ.कल्पना चौसाळकर, वर्षा मुंडे, शुभदा देशमुख, ज्योती ठाकुर, प्रवीण देशमुख, विष्णु सोनवणे, आप्पाराव यादव, बाबुराव आडे, अविनाश तळणीकर, संजय गुरव, रविकुमार पेशकार, विष्णुपंत कुलकर्णी, उमेश जगताप, अमरनाथ खुर्पे, स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष विजय वालवडकर, कार्यवाह किरण कोदरकर आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन सपना डुकरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार आप्पाराव यादव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संकुलातील सर्व मान्यवर पदाधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदेमातरमने झाली

COMMENTS