Homeताज्या बातम्यादेश

दिल्ली मेट्रोत महिलांचा पुन्हा राडा

नवी दिल्ली प्रतिनिधी - दिल्ली मेट्रो आणि गोंधळ हे आता एक समीकरणच झालंय. रोज दिल्ली मेट्रोत काही ना काही गोंधळ होतच असतो. कधी मेट्रोत बसण्यावरु

“ठाकरे साहेब भाजपचा अजेंडा राबवतात”
जय जवान गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात रचले 9 थर
नितीनराव औताडे यांचा शिवसेनेत प्रवेश

नवी दिल्ली प्रतिनिधी – दिल्ली मेट्रो आणि गोंधळ हे आता एक समीकरणच झालंय. रोज दिल्ली मेट्रोत काही ना काही गोंधळ होतच असतो. कधी मेट्रोत बसण्यावरुन हाणामारी तर कधी प्रवाशांसोबत होणारी गैरवर्तणूक किंवा रिल्स तयार करणे असो अशा विविध कारणांनी दिल्ली मेट्रो कायम चर्चेत असते. अशातच एका महिला प्रवाशाच्या बाचाबाचीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या ताज्या प्रकरणात एका महिलेचा एका तरुणीसोबत जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. डीएमआरसीच्या इशाऱ्यांनंतरही दिल्ली मेट्रोमध्ये नाचणे, गाणे, हाणामारी आणि गोंधळ सुरुच आहे. यापूर्वी तर मेट्रोमध्ये अश्लिल कृत्य करतानाचेही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता दिल्ली मेट्रोमधील दोन महिलांचे भांडण सध्या जोरदार चर्चेत आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला उभी राहून भांडत आहे तर समोर एक मुलगा आणि मुलगी खाली बसलेली आहे. महिला बसण्यासाठी मुलीला थोडीसे सरकायला सांगते. त्यावरुनच दोघांमध्ये भांडण होते आणि दोघांमध्ये वाद होतो. ती महिला तू मला पागल कसा म्हणालास? असे ओरडत असते. महिलेची आरडाओरड पाहून मुलगासुद्धा भडकतो आणि उठून उभा राहतो आणि मी तुला थोडीच म्हणालो असे म्हणतो. त्यावर मुलासोबत असलेली तरुणी त्याला शांत राहायला सांगते. तितक्यात महिला तू काय करशील असे त्याच्यावर ओरडते. यानंतर दोन्ही महिला एकमेकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून भांडू लागतात. उभी असलेली महिला त्या मुलासोबत असलेल्या मुलीला, तू तुझ्या आई-वडिलांशी खोटे बोलून मुलासोबत फिरते आहेस, असेही म्हणताना दिसत आहे. दरम्यान समोरच्या सीटवर बसून कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काढला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे

COMMENTS