मसूर / वार्ताहर : शेतकरी हा शेतीचा खरा शिल्पकार असून उसाचे एकरी 100 टनाच्यावर उत्पादन घ्यायचे असेल तर शेतकरी वर्गाने पारंपारीक शेतीला छेद देत अधु
मसूर / वार्ताहर : शेतकरी हा शेतीचा खरा शिल्पकार असून उसाचे एकरी 100 टनाच्यावर उत्पादन घ्यायचे असेल तर शेतकरी वर्गाने पारंपारीक शेतीला छेद देत अधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. उसाच्या दोन्ही सर्यातील अंतर कमीत कमी साडेचार फूट व जास्तीत-जास्त सहा फूट असावे तरच योग्य मशागत होवून उसाचे एकरी वजन वाढण्यास मदत होते, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूट पुणेचे माजी शास्त्रज्ञ डॉ. सुरेश माने-पाटील यांनी केले.
किवळ, ता. कराड येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), माई चॅरिटेबल ट्रस्ट किवळ, विकास सेवा सोसायटी किवळ-खोडजाईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ऊस पिक लागण व्यवस्थापन याविषयावर ते बोलत होते. यावेळी जि. प. चे माजी अध्यक्ष चंद्रकांत जाधव, कराड पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊसाहेब चव्हाण, डॉ. विजय साळुंखे, सह्याद्री कारखान्याचे संचालक पै. संजय थोरात, बजरंग पवार, माजी संचालक तानाजीराव जाधव, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, माजी सनदी अधिकारी तानाजीराव साळुंखे, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगिता साळुंखे, निगडी विकास सोसायटीचे चेअरमन संजय घोलप, किवळ विकास सोसायटीचे चेअरमन वामनराव साळुंखे, व्हाईस चेअरमन रंजना साळुंखे, उपसरपंच राहूल साळुंखे, पांडुरंग चव्हाण, आर. जी. तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सुरेश माने म्हणाले, ऊस हे शाश्वत पिक आसून एकरी उसाचे वजन वाढवायचे असेल तर त्याचे सुरूवातीपासून योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. लागणीला 86032 या उसाची लागण अधिक फायदयाची आहे. शेतकर्यांनी आपल्या लागणीसाठी लागणारे बियाणे स्वत: तयार केले पाहीजे.
डॉ. माने म्हणाले, तुकाराम महाराजांनी शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी असे ब्रीद लिहून ठेवले आहे. मात्र, हे कळायला आपल्याला चारशे वर्षे लागली ही दुर्दैवी बाब असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.
यावेळी कराड उत्तरमधील एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेणार्या भिमराव इंगवले, तात्यासो पोळ, निवासराव जाधव, रामराव बाईंग, जयसिंग धस, बाळकृष्ण धस, शिरीष सुर्यवंशी, निता सुर्यवंशी, शरद पावशे, दिलीपराव साळुंखे, अनिल साळुंखे या शेतकर्यांना फेटा, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
प्रास्ताविकात तानाजीराव साळुंखे म्हणाले, कीवळणे एकजुटीतून लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने दुष्काळी कलंक पुसला असून किवळ हे गाव आता ऊस उत्पादक शेतीचे गाव म्हणून लौकिक वाढवत आहे. पाण्याची काटकसर कशी करावी हे कीवळकराना चांगलं माहीत आहे. खूप पाणी खत म्हणजे चांगली उत्पादन शेती या विश्वातून आता शेतकर्यांनी बाहेर येण्याची गरज आहे. परंतू आधुनिक तंत्रज्ञानाने शेती केली तर कमी पाणी खत व कमी खर्चात एकरी जादा उत्पादन करण्यासाठी मार्गदर्शक तत्वाने शेती करण्याची गरज आहे.
सूत्रसंचालन माजी उपसरपंच सुनिल साळुंखे यांनी केले तर आभार रामराव साळुंखे यांनी मानले. यावेळी संगीता साळुंखे, डॉ. विजय साळुंखे, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास अमोल मुळीक, शिवाजीराव साळुंखे, सुहास साळुंखे, अनिल नळगुणे, खराडेचे माजी सरपंच मारुती जाधव, मसूरचे संभाजीराव जगदाळे, मंडल कृषी अधिकारी विनोद कदम, सुशांत भोसले, पर्यवेक्षक अशोक कोळेकर, पंडित मोरे तसेच किवळ व पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उसाचे एकरी शंभर टन उत्पादनाची गुरुकिल्ली या तानाजीराव साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
उसाची शेती करत असताना महिलांनीही पुढे येण्याची गरज आहे. त्यांनीही योग्य नियोजन करून उसाचे एकरी 100 टनाचेवर उत्पादन घ्यावे. पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमात जास्तीत-जास्त महिलांचा फेटा, मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येईल, असे संगीता साळुंखे यांनी स्पष्ट केले.
COMMENTS