Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूर यात्रेत दागिने चोरणार्‍या महिलेला रंगेहात पकडले

अकोले प्रतिनिधी ः अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी गावात योगी रामदास बाबा संजीवन समाधी सोहळ्याच्या यात्रेनिमित्त आलेल्या महिलेचे गर्दीत सोन्याचे दा

माळीवाडा परिसरातील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्याचे काम सुरु
संजीवनीच्या तीन अभियंत्यांची किर्लोस्करमध्ये नोकरीसाठी निवड                    
छत्रपती प्रतिष्ठानच्या पारितोषिकांचे 9 एप्रिलला वितरण

अकोले प्रतिनिधी ः अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी गावात योगी रामदास बाबा संजीवन समाधी सोहळ्याच्या यात्रेनिमित्त आलेल्या महिलेचे गर्दीत सोन्याचे दागिने चोरी करणार्‍या ’त्या’ महिलेस रंगेहात पकडले. तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेतून महिला चोरांची मोठी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले आहे.
बेलापूरला योगी रामदास बाबा यांचा संजीवन समाधी सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यानिमित्तीने अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत असताना शेवटच्या दिवशी गावातील प्रत्येक घरातून चपाती जमा करत गावकरी बेलापुरची प्रसिद्ध आमटीचा महाप्रसाद बनवतात. या चपातीआमटी महाप्रसाद घेण्यासाठी दूर वरून भाविक येत असतात. या निमित्ताने मोठी यात्रा भरली जाते. गुरूवार 20 जून रोजी चैतन्यपुरहून सुजाता व पती वसंत महादू मुळे हे मुलांसमवेत यात्रेसाठी आले होते. दुपारी 3 वाजताच्या सुमारास बेलापूर गावातील नातेवाईक लीना सुधीर हुलवळे व सर्व मुळे कुटुंबाने योगी रामदास बाबांचे दर्शन घेऊन आमटीचा महाप्रसाद घेतला. वस्तू खरेदी करण्यासाठी फिरत असतानाच 20 वर्षीय, अंगावरराखाडी रंगाचा ड्रेस असलेली महिला दीड तोळ्यांचे गळ्यातील दागिने चोरून घेऊन पळून जाताना दिसली. प्रसंगावधान साधत सुजाता मुळे या महिलेने आरडा ओरडा केला. लागलीच लोक जमली व चोर महिलेला पकडले. तिच्याकडे एक लहान बाळ देखील होते. अकोले पोलिस स्टेशनचे पोलिस किशोर तळपे, पोलिस गोरे, एक महिला कॉन्स्टेबल यांनी बेलापूर गावातील घटनास्थळ गाठत चोर महिलेला ताब्यात घेतले.

COMMENTS