Homeताज्या बातम्यादेश

पाण्यावर चालणारी महिला व्हायरल

जबलपूर प्रतिनिधी - पहिले तव्यावर बसणारा बाबा, नंतर पाण्यावर तरंगणारा बाबा आणि आता पांढऱ्या साडीत पाण्यावर चालणारी महिलेचा व्हिडीओ इंटरनेटवर तु

वीर सावरकरांची बदनामी शिवसेनेला मान्य नाही 
Ahmednagar : नाशिक-पुणे महामार्गावर सीएनजी गॅस वाहतूक करणारा टेम्पोचा अपघात | LOKNews24
काढलेले पेव्हिंग ब्लॉक पुन्हा बसवा ः सरफराज पठाण

जबलपूर प्रतिनिधी – पहिले तव्यावर बसणारा बाबा, नंतर पाण्यावर तरंगणारा बाबा आणि आता पांढऱ्या साडीत पाण्यावर चालणारी महिलेचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतो आहे. पांढऱ्या रंगातील साडीमधील या महिलेला लोकांनी देवी मानत या चमत्काराची बातमी वाऱ्यासारखी पसरली. व्हिडीओ मागील सत्य जाणून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल. हा व्हिडीओ म्हणजे अंधश्रद्धा पसरविणारा ठरला आहे. या व्हिडीओची पोलिसांनी दखल घेतल्या त्या महिलेचं सत्य समोर आलं. हा व्हिडीओ मध्य प्रदेशमधील जबलपूरमधील आहे. पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतल्यावर अनेक ध्ककादायक खुलासे समोर आले आहेत. या महिलचं नाव ज्योतीबाई असून तिन 51 वर्षांची आहे. ती नर्मदापूरची रहिवासी असून ती मे 2022 पासून घरातून बेपत्ता होती. तिच्या मुलाने आई बेपत्ता असल्याची तक्रारही पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. त्याने सांगितल्या प्रमाणे त्याची आई ही मानसिक रुग्ण आहे. म्हणून असं वाटलं ती पाण्यावर चालतेय…या व्हिडीओमागील सत्य सांगताना पोलिसांनी सांगितलं की, ज्या ठिकाणी ही महिला चालत असल्याचं वाटलं त्या ठिकाणी नदीत पाणी कमी होतं. दूर असं वाटलं की पाण्यावरुन चालत आहे. पोलिसांनी तिला विचारलं की तुझे कपडे ओले नव्हते, त्यावर ती महिला म्हणाली की, तिने नदीत आंघोळ केली होती पण उन्हामुळे तिचे कपडे लगेचच सुकले होते.दरम्यान पोलिसांनी असे दिशाभूल करणाऱअया व्हिडीओपासून दूर राहण्याचा आणि अंधश्रद्धेला प्रोत्साहन देऊन नये, शिवाय सोशल मीडियावर असे व्हिडीओ व्हायरल करुन ये, अशी ताकद दिली आहे

COMMENTS