अकोला प्रतिनिधी - अकोला शहरातल्या रेल्वे स्टेशनवर काल रात्री 9 वाजताच्या सुमारास वाशिम येथील 42 वर्षीय बेबी खिलारे ही महिला मुंबईला जाण्यासा

अकोला प्रतिनिधी – अकोला शहरातल्या रेल्वे स्टेशनवर काल रात्री 9 वाजताच्या सुमारास वाशिम येथील 42 वर्षीय बेबी खिलारे ही महिला मुंबईला जाण्यासाठी अकोला रेल्वे स्टेशनवर आली. पण तेवढ्यात अमरावती वरून मुंबईला जाणारी अंबा एक्सप्रेस ही स्टेशनवरून निघाली. तर चालती ट्रेन तिच्या मुलीने पकडली , पण ही महिला ट्रेन पकडत असताना तिचा पाय घसरून तोल गेला , आणि ती रेल्वेखाली जावू लागली. तेवढ्यात स्टेशनवर व्हेंडर शंकर स्वर्गे याने त्या महिलेला ओढल्याने त्या महिलेचे प्राण वाचले. त्याच वेळेस ट्रेन मध्ये चढलेल्या मुलीनेही ट्रेन मधून स्टेशनवर उडी घेतली पण सुदैवाने दोघींचे ही प्राण वाचले असून हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. तर यात व्हेंडर शंकर स्वर्गे याचे कौतुक होत आहे.
COMMENTS