Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेची सोसायटीच्या जिन्यात आत्महत्या

पुणे/प्रतिनिधी : पतीने घरातून हाकलून दिल्याने महिलेने सोसायटीच्या जिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवार पेठेत घडली. पतीने घ

एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं आयुष्य
भारताचा विश्वचषकात पराभव झाल्यामुळे तरुणाची आत्महत्या
मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या

पुणे/प्रतिनिधी : पतीने घरातून हाकलून दिल्याने महिलेने सोसायटीच्या जिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवार पेठेत घडली. पतीने घरातून हाकलून दिल्यानंतर महिला तीन दिवस उपाशी होती. सुलभा सुरेंद्र पुजारी (वय 42, रा. वैष्णव अपार्टमेंट, रविवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती सुरेंद्र रवींद्र पुजारी (वय 42), दीर समीर, सासू रजनी यांच्यविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुलभा यांचा भाऊ रवी वाघे (वय 44, रा. गणेशनगर, उस्मानाबाद) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरेंद्र पुजारी आणि त्याचे कुटुंबीय सुलभा यांचा छळ करत होते. शारीरिक, मानसिक त्रासामुळे सुलभा त्रासल्या होत्या. सुरेंद्रने सुलभाला घरातून हाकलून दिले. सुलभा तीन दिवस सोसायटीच्या जिन्यात राहत होत्या. त्यांना जेवणही देण्यात आले नव्हते. तीन दिवसांपूर्वी सुलभा यांनी जिन्याच्या शेजारी असलेल्या खिडकीला दोर बांधून गळफास घेतला. सुलभा यांचा भाऊ रवि यांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. त्यानंतर ते पुण्यात आले. चौकशीत सुलभा यांचा छळ करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर रवि यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक शेडगे तपास करत आहेत.

COMMENTS