केडगाव येथे महिलेस लोखंडी पाईपने मारहाण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केडगाव येथे महिलेस लोखंडी पाईपने मारहाण

अहमदनगर/प्रतिनिधी : पाण्याच्या पाईपावरून चारचाकी वाहन नेल्याबाबत विचारणा केल्याचा राग येऊन 47 वर्षीय महिलेस शिवीगाळ, दमदाटी करुन लोखंडी पाईपने बेदम म

कोल्हे सहकारी कामगार पतपेढीला 46 लाख रूपयांचा नफा
पंढरीच्या वारीला लाभली तीनशे वर्षांची अखंड पायी दिंडीची परंपरा  
खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत रंगला शह-काटशह…

अहमदनगर/प्रतिनिधी : पाण्याच्या पाईपावरून चारचाकी वाहन नेल्याबाबत विचारणा केल्याचा राग येऊन 47 वर्षीय महिलेस शिवीगाळ, दमदाटी करुन लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. ही घटना केडगाव मधील ओंकारनगर येथे घडली. याबाबतची माहिती अशी की, सौ. मंगल मधुकर काळे (वय 47 वर्षे, रा.ओंकार नगर, केडगाव) यांचे शेजारी स्वप्नील साळवे हा त्याच्या पत्नीसह राहतो. गुरुवारी (दि.9) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या परिसरात पाणी सुटले होते.
त्यावेळी स्वप्नील साळवे हा त्याची चारचाकी गाडी धुवत होता. त्यावेळी मंगल काळे त्याच्या गाडीसमोरुन पाईप टाकून त्यांच्या दुसर्‍या घरामध्ये पाणी भरीत होत्या. त्यानंतर स्वप्नील साळवे याने त्याची गाडी धुवून झाल्यानंतर ती काळे यांनी टाकलेल्या पाईपवरुन घेऊन गेला. हे काळे यांनी पाहिले असता त्यावेळी त्यांनी साळवे याच्या पत्नीस म्हणाल्या की, आमच्या पाईपवरुन गाडी का घातली? पाईप फुटला असता, तुम्हाला गाडी न्यायची होती तर मला सांगायचे. मी गाडी काढेपर्यंत, पाईप काढला असता, असे बोलले असता त्याची पत्नी काळे यांना बोलली की, तुमच्या झाडाचा कचरा आमच्या दारात येतो, तेव्हा आम्ही तुम्हाला काही बोलतो का, असे बोलून तिने काळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात करुन व तिने स्वप्नील साळवे यास फोन करुन बोलावून घेतले. त्यावेळी काळे या घराचे कंपाउंडजवळ गेल्या. तेवढयात स्वप्नील साळवे हा त्याची फोर व्हीलर गाडी घेऊन त्या ठिकाणी आला व गाडीतून लोखंडी पाईप घेऊन खाली उतरुन काळे यांना शिवीगाळ करुन लोखंडी पाईपने मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी काळे यांनी त्यास मला का मारतोस, मला मारु नको, असे बोलले असताना त्याने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने त्यांच्या पोटावर मारले. त्यावेळी त्याच्या पत्नीने काळे यांना शिवीगाळ करुन तुमच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करुन तुम्हाला अडकवतो, असे बोलून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर काळे या स्वप्नील साळवे व त्याची पत्नीविरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास आल्या. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहे.

COMMENTS