Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरी करणारी महिला आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर/प्रतिनिधी ः एस टी बस मधून प्रवास करणार्‍या महिला प्रवाशांच्या बॅगेमधील, आणि गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणार्‍या महिलेस स्थानिक गुन्हे अन्

शेतकऱ्यांनी केली होती गांज्याची शेती… पोलिसांनी टाकली धाड…
राहत्या पालात तलावाचे पाणी शिरलेल्या आदिवासी बांधावांना मदत
गौरी शुगर कारखाना जिल्ह्यातील उच्चांकी भाव देणार : बोत्रे पाटील

अहमदनगर/प्रतिनिधी ः एस टी बस मधून प्रवास करणार्‍या महिला प्रवाशांच्या बॅगेमधील, आणि गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणार्‍या महिलेस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून शिताफीने पकडले. ही कारवाई सावेडी परिसरातील तारकपुर बसस्थानक येथे केली.
या बाबतची हकिगत अशी की, श्रीमती. गायत्री नामदेव जव्हादे (वय 36, रा. वाकडी, ता. नेवासा) या दिनांक 23 जून रोजी पैठण येथे जाण्यासाठी शेवगाव बसस्टॅण्ड येथे थांबलेल्या असताना त्यांचे बॅगेतील 16 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे झुंबर व रोख रक्कम अनोळखी चोरट्याने चोरुन नेले होते. या घटने बाबत शेवगाव पोलिस ठाण्यात भा द वी क 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस अधीक्षक ओला यांनी पोलिस निरीक्षक. दिनेश आहेर यांना ना उघड चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते. या आदेशान्वये पोलिस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सूचना दिल्याने पथक रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेत असता पोलिसाना माहिती मिळाली की, तारकपूर बस स्थानकाजवळ एक महिला हिरव्या रंगाची साडी व हातात लाल रंगाची बॅग घेवुन संशयीतरित्या उभी असुन ती बसमध्ये चढणार्‍या प्रवाशांच्या बॅगेमधून तसेच गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणारी आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने तारकपुर बस स्टॅण्डवर जाऊन खात्री करता एक महिला मिळुन आली. तिला पोलिस पथकाची ओळख सांगुन तिचे नाव गाव विचारले असता तिने तिचे नाव उर्मिला नवनाथ काळे (वय 58, रा.वाकी, ता.आष्टी,जिल्हा बीड) असे असल्याचे सांगितले. तिची झडती घेतली असता तिचे बॅगमध्ये तुटलेले सोन्याचे झुंबर मिळुन आले त्याबाबत विचारपुस करता तिने दोन महिन्यापूर्वी शेवगाव बस स्टॅण्ड येथुन एक महिलेच्या बॅगेतून चोरी केल्याची कबुली दिल्याने तिला मुद्देमालासह ताब्यात घेवुन शेवगाव पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास शेवगाव पोलिस करीत आहे.
महिला आरोपी उर्मिला नवनाथ काळे ही सराईत गुन्हेगार असुन तिचे विरुध्द अ.नगर जिल्ह्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकुण पाच गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उप अधिक्षक सुनिल पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

COMMENTS