तरुणीचा पत्ता न सांगितल्याने तिघांकडून एकास बेदम मारहाण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरुणीचा पत्ता न सांगितल्याने तिघांकडून एकास बेदम मारहाण

अहमदनगर/प्रतिनिधी : तिघांनी एकास तरुणीचा पत्ता विचारला असता त्याने सांगितला नाही म्हणून त्यास लाकडी दांडके व कुर्‍हाडीने बेदम मारहाण केली. ही घटना के

एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी पै. धनश्री फंडची निवड
राष्ट्रीय महामार्गावर गतीरोधक बसवण्याची वंचितची मागणी
जेलमधून पाच जणांचे पलायन, तिघांना पकडण्यात यश

अहमदनगर/प्रतिनिधी : तिघांनी एकास तरुणीचा पत्ता विचारला असता त्याने सांगितला नाही म्हणून त्यास लाकडी दांडके व कुर्‍हाडीने बेदम मारहाण केली. ही घटना केडगाव परिसरातील दूध सागर सोसायटी येथे घडली. नागेश धर्मराज सानप (वय 23 वर्षे,रा. दूधसागर सोसायटी, केडगाव, अ.नगर) हा तरुण त्याच्या घराजवळ उभा असताना सोनु विश्‍वकर्मा हा त्याच्या दोन अनोळखी साथीदारांसह तेथे आला. त्याने कल्पना गायकवाड ही कोठे आहे असे विचारले असता नागेश सानप त्यांना म्हणाला की, ती कोठे गेली आहे हे मला माहीत नाही, असे म्हणाल्याचा तिघांना राग आल्याने त्यांनी सानप यास शिवीगाळ केली व सोनू विश्‍वकर्मा याने त्याच्या हातातील कुर्‍हाडीने त्याच्या डोक्यात मारुन जखमी केले व दोन अनोळखी आरोपींनी लाकडी दांडक्याने व लाथबुक्क्याने सानप यांच्या पाठीवर, हातावर व पायावर मारुन दुखापत केली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी नागेश सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहे. शेजारी राहणारे कुठे गेले याची माहिती न दिल्याने तिघांनी युवकाला केलेल्या मारहाणीने परिसरात खळबळ उडाली आहे.

COMMENTS